Sunday, May 19, 2024

आयुष्यभरासाठी सुशांतसोबत जोडलंय रियाचं नाव! दीपिका अन् कॅटरिनालाही मागे टाकत ‘या’ यादीत मिळवलंय अव्वल स्थान । Happy Birthday Rhea Chakraborty

अनेक वादविवादांनंतर स्वतःला उभारी देत पुढे आलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. रियाने अनेक चित्रपटात काम केले आहे. पण या गोष्टीची जाणीव कधी तिला देखील झाली नसेल की, संपूर्ण जग तिला तिच्या अभिनयामुळे नाही, तर सुशांत सिंग राजपूतमुळे ओळखेल.  शनिवारी (1 जुलै) रिया तिचा वाढदिवस साजरा करत आहे. रियाचा जन्म 1 जुलै, 1992 रोजी बेंगळुरू येथे झाला. ‘एमटीव्ही इंडिया’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणारी रिया ही सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर खूप चर्चेत आली. (Rhea Chakraborty birthday, let’s know about her love life)

रिया चक्रवर्तीचे वडील एक आर्मी ऑफिसर होते. तिने तिच्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवरील ‘वीजे’मधून केली होती. तिने तेलुगू चित्रपटात काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने ‘मेरे डॅड और मारूती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

रिया चक्रवर्ती ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पण त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधी ती त्याला सोडून निघून गेली होती. सुशांतच्या मृत्यूमध्ये तिला मुख्य आरोपी मानले गेले होते.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर जेव्हा तपास करायला सुरुवात झाली, तेव्हा लव्ह एँगल पासून ते फायनान्स आणि ड्रग्ज घेतल्याची माहिती समोर आली. याबाबत तपास अजूनही चालूच आहे.

सुशांत सिंगला जाळ्यात अडकवून त्याचे पैसे हडप केल्याचा आरोप रियावर लावला गेला होता. परंतु याबाबत अजून कोणताही पुरावा मिळाला नाही. एवढंच काय तर सुशांतच्या मृत्यूनंतर तिला जेलची हवा देखील खायला लागली होती. ती सध्या जामिनावर बाहेर आहे. पण तिच्यावरचे आरोप आजही कायम आहेत.

सुशांतच्या कुटुंबियांनी लावलेल्या सगळ्या आरोपांचे रियाने सोशल मीडियावर खंडन केले होते. त्याच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेली रिया आजही अनेकवेळा सुशांतबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना दिसत असते. सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त तिने फोटो शेअर करून लिहिले होते की, “मला माहित आहे तू इथेच माझ्यासोबत आहे.”

रिया आता देखील एका गोष्टीमुळे खूप चर्चेत आली आहे. पण या वेळेस ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. रियाने द टाईम्सच्या टॉप 50 मोस्ट डिजायरेबल वूमन 2020 लिस्टमध्ये टॉप केले आहे.

रिया चक्रवर्तीने दीपिका पदुकोण, दिशा पटानी, कॅटरिना कैफ या बॉलिवूड अभिनेत्रींना मागे सारून या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

रियाने बॉलिवूडमध्ये ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘सोनाली केबल’, ‘जलेबी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. पण तिला या चित्रपटातून काही खास ओळख मिळाली नाही. ती तिच्या ‘चेहरे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि इम्रान हाशमी असणार आहे.

अधिक वाचा –
– पूनम पांडेच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा
– ‘Bigg Boss OTT 2’मध्ये स्पर्धकांनी ओलांडल्या सर्व मर्यादा; एकमेकांच्या जवळ गेले आणि…

हे देखील वाचा