Saturday, November 23, 2024
Home अन्य ‘साठ वर्षाचा अभिनेता ३० वर्षाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करतो’, विवेक अग्निहोत्री यांनी साधला आमिर खानवर निशाणा

‘साठ वर्षाचा अभिनेता ३० वर्षाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करतो’, विवेक अग्निहोत्री यांनी साधला आमिर खानवर निशाणा

आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor ) यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ होती, मात्र बॉक्स ऑफिसवर तो काही कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाला खूप संमिश्र प्रतिसाद मिळाला, ज्यावर प्रेक्षकांनी ‘फॉरेस्ट गंप’ हा हॉलिवूड चित्रपट आधीच पाहिला होता, त्यामुळे त्यांना कथा जवळपास माहित होती. लाँग वीकेंड आणि सुट्टीचा दिवस असताना या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 11.5 कोटींची कमाई केली. आठवड्याच्या शेवटी, काहींना या चित्रपटाकडून आशा होती की पहिल्या दिवसाची प्रतिक्रिया पाहता, तो 1300 स्क्रीनवरून हटविला गेला. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनाही हा चित्रपट फारसा समजला नाही.त्यांचे हे ट्विट चित्रपटापेक्षा जास्त व्हायरल होत आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा द काश्मिर फाईल्स चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटाला देशभरात अभूतपुर्व असा प्रतिसाद पाहायला मिळाला होता. विवेक अग्निहोत्री आपल्या दमदार चित्रपटांप्रमाणेच स्पष्ट विधानांसाठीही ते प्रसिद्ध आहेत. अलिकडेच असेच वक्तव्य त्यांनी आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपटाबद्दल केले आहे.

आमिर खानचे नाव न घेता चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. विवेक अग्निहोत्री म्हणतात की, की सध्या बॉलीवूड बुडत आहे कारण एक 60 वर्षांचा नायक 20-30 वर्षांच्या अभिनेत्रीवर रोमान्स करत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही प्रेक्षकांना नैसर्गिक काय दाखवत आहात? तसेच VFX च्या मदतीने चित्रपटात किती गोष्टी बदलल्या जात आहेत.

विवेक अग्निहोत्रीचे हे ट्विट अनेक यूजर्सना आवडले नाही. त्यांनी विवेक अग्निहोत्रीला आमिर खानच्या ‘पीके’ या चित्रपटाला सपोर्ट करतानाचे त्यांचे जुने दिवस आठवले. याशिवाय साऊथ सिनेमातही काही बेताल गोष्टी घडत असल्याचंही यूजर्स सांगत होते. आणि खुद्द विवेक अग्निहोत्री या गोष्टींकडे दुर्लक्ष करून बॉलीवूडवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहेत, हे चुकीचे आहे. एका यूजरने लिहिले, ‘सर, फक्त बॉलिवूडच का? दक्षिणेत रजनीकांत 20 वर्षांपासून हे करत आहेत, त्यांना का टार्गेट केले जात नाही? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

हेही वाचा –कुणी म्हटलं ‘स्टनिंग’, तर कुणी ‘अति सुंदर’, दिशाच्या बेधुंद करणाऱ्या व्हिडिओवर चाहतेही फिदा
लागोपाठ दोन सिनेमांच्या रिलीझपूर्वीच विक्रमने ट्विटरवर उघडले अकाऊंट, झटक्यात वाढले ‘एवढे’ फॉलोव्हर्स
बॉलिवूडमध्येही स्वातंत्र्यदिनाची धून, ‘या’ कलाकारांनी घरावर तिरंगा फडकावून दिला ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला पाठिंबा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा