×

कपूर खानदानात पुन्हा ऐकू येणार सनईचे सूर, ‘ही’ अभिनेत्री पुन्हा चढणार बोहल्यावर?

काही दिवसांपूर्वीच कपूर खानदानामध्ये सनई चौघड्याचे सूर घुमले. करिश्मा कपूरचा चुलत भू असणारा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी नुकतीच लगीनगाठ बांधली. अतिशय धुमधडाक्यात आणि भव्य समारंभात त्यांचे लग्न संपन्न झाले. आता या लग्नाच्या काही दिवसांनंतर लगेच कपूर घरातील अजून एका व्यक्तीच्या लग्नाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. असे काय झाले की अचानक करिश्माच्या लग्नाच्या चर्चा व्हायला लागल्या? चला तर जाणून घेऊया.

सगळ्यांनाच माहित आहे की, करिश्मा कपूरचे लग्न झाले होते, मात्र दुर्दैवाने तिचा घटस्फोट झाला. सध्या करिश्मा सिंगल असून आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. सोशल मीडियावर तिने नुकतेच आपल्या फॅन्ससोबत ‘आस्क मी एनीथिंग’ हे एक सेशन घेतले. यादरम्यान करिश्माने तिच्या वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यातील गोष्टींवर मनमोकळी उत्तरं दिली. या सेगमेंटमध्ये तिने तिचे आवडते कलाकार, आवडता पदार्थ, आवडता रंग आदी प्रश्नांसोबतच ती लग्न कधी करणार या प्रश्नाचे देखील उत्तर दिले.

‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनमध्ये करिश्माला विचारले की, तिला रणबीर कपूर जास्त आवडतो की रणवीर सिंग. यावर तिने उत्तर दिले ‘दोन्ही.’ यावेळी तिने सांगितले की तिला बिर्याणी खूपच आवडते. तर तिचा आवडता रंग काळा असल्याचे ती म्हणाली. यावेळी तिला एक अतिशय पर्सनल प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न होता की, “तुम्ही दुसऱ्यांदा लग्न करणार का?” यावर करिश्माने एक गोंधळले गिफ शेअर करत लिहिले, ‘डिपेंडस’ अर्थात अवलंबून. करिश्मा खूपच कमी वेळा तिच्या भूतकाळाबद्दल बोलते त्यामुळे तिने आता हे दिलेले उत्तर अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

करिश्माने २००३ साली दिल्लीमधील व्यावसायिक असलेल्या संजय कपूरसोबत लग्न केले होते. त्या दोघांना मुलगी सामायरा आणि मुलगा कियान ही मुलं असून २०१४ पर्यंत करिश्मा नवऱ्यापासून वेगळे राहू लागली आणि २०१६ साली तिने घटस्फोट घेतला. या दोघांनी एकमेकांवर खूपच गंभीर आरोप लावले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post