Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड किरण रावचा ‘लापता लेडीज’ दाखवला जाणार सर्वोच्च न्यायालयात! स्क्रीनिंग साठी कोर्टात पोचला आमीर खान

किरण रावचा ‘लापता लेडीज’ दाखवला जाणार सर्वोच्च न्यायालयात! स्क्रीनिंग साठी कोर्टात पोचला आमीर खान

अभिनेता आमीर खानची दुसरी पत्नी, किरण रावने दिग्दर्शन केलेला लापता लेडीज हा चित्रपट अनेकांना आवडला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तसेच नेटफ्लिक्सवर देखील अनेकांना हा चित्रपट आवडला. किरण रावचा हा दुसरा चित्रपट होता. यापूर्वी तिने २०१० साली “धोबी घाट” हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

लापता लेडीज १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती आमीर खानने केली होती. आता या चित्रपटाची स्क्रीनिंग सर्वोच्च न्यायालयात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अभिनेता आणि या चित्रपटाचा निर्माता आमीर खान सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला आहे. या निमित्ताने हाय कोर्टाचे चीफ जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी आमीर खानचे स्वागत केले आहे. हा या सिनेमासाठी एक मोठा बहुमान आहे. यापूर्वी असा बहुमान फारच कमी चित्रपटांना मिळाला आहे.  

आज हा चित्रपट न्यायालयात न्यायाधीशांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना, त्याचबरोबर, रजीस्ट्री अधिकाऱ्यांना दाखवला जाणार आहे. हा चित्रपट एका गावात घडणारी एक घटना विषद करतो. यात नितांशी गोयल, प्रतिभा रान्ता आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत होते. तसेच रवी किशन, छाया कदम, गीता अग्रवाल शर्मा आदींच्या देखील भूमिका होत्या.      

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहेत साऊथचे हे चित्रपट! जाणून घ्या यादी…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा