Friday, September 20, 2024
Home टॉलीवूड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहेत साऊथचे हे चित्रपट! जाणून घ्या यादी…

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहेत साऊथचे हे चित्रपट! जाणून घ्या यादी…

बाहुबली, केजीएफ, पुष्पा, आरआरआर, कांतारा यांसारख्या दक्षिणात्य चित्रपटांनी देशभरात तुफान कमाई केली. फक्त दक्षिणेतच नव्हे तर हे सिनेमे संपूर्ण देशात गाजले. या सिनेमांनी अफाट यश मिळवत एका वेळेला हिंदी चित्रपटांना सुद्धा मागे टाकलं. हेच यश पुन्हा संपादन करण्यासाठी दक्षिणेतून अजूनही अनेक सिनेमे यावर्षी प्रदर्शनासाठी सज्ज झालेत. जाणून घेऊया या चित्रपटांविषयी…

पुष्पा – २ – द रूल

२०२१ साली आलेल्या अल्लू अर्जुन अभिनित पुष्पा या सिनेमेचा हा सिक्वेल आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षकांमध्ये दुसर्या भागाविषयी देखील खूप उत्सुकता आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंधना, फाहद फासील मुख्य भूमिकेत आहेत. अल्लू अर्जुन ने या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला हा चित्रपट ६ डिसेम्बर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम  

थालापती विजय अभिनित गोट हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विजय जोसेफ, प्रशांत, प्रभू देवा, मोहन जयराम, स्नेह, लीला, मीनाक्षी चौधरी, योगी  बाबू, अशा अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहे. ‘लियो’ चित्रपटानंतर हा विजयचा पुढचा चित्रपट आहे.    

देवारा 

देवारा या सिनेमात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ आली खान मुख्य भूमिकेत आहे. सैफ आली खान या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आरआरआर च्या अफाट यशानंतर ज्युनियर एनटीआरचा हा पुढचा चित्रपट आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार आहे.  

गेम चेंजर 

आरआरआरच्या यशानंतर अभिनेता राम चरण त्याच्या आगामी गेम चेंजर या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन एस. शंकर यांनी केलय. शंकर यांचा इंडियन २ नुकताच प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नव्हता. बघुयात हा चित्रपट कसा होतोय ते. हा चित्रपट देखील याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.    

ठग लाईफ 

कमल हसन आणि अमिताभ बच्चन यांना घेऊन प्रसिद्ध दिग्दर्शक मणीरत्नम ठग लाईफ हा चित्रपट बनवत आहेत. या सिनेमात त्रिशा कृष्णन, अभिरामी गोपिकुमार, नासीर, ऐश्वर्या लक्ष्मी इत्यादी कलाकार काम करत आहेत. कमल आणि मणी हे १९८७ नंतर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होत आहे.  

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

‘पुष्पा’ च्या निर्मात्यांनी दिलं चाहत्यांना गिफ्ट! शेयर केला फहाद फासीलचा फर्स्ट लूक…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा