करोडपती व्हायचंय तर शोधा कुत्रे! हॉलिवूड पॉप सिंगरचे दोन बुलडॉग चोरीला; ठेवले ३ लाख डॉलरचे बक्षीस

Lady Gaga Dog Walker Shot And Bulldogs Stolen In City Los Angeles


आतापर्यंत आपण सेलिब्रिटींची गाडी, मोबाईल, पर्स यांसारख्या गोष्टी चोरी झाल्याचे ऐकले आहे. आपल्या गोष्टी परत मिळवण्यासाठी ते पोलिसांत तक्रार नोंदवतात. तसेच आपल्या वस्तू परत मिळवण्यासाठी आवाहनही करतात. परंतु हॉलिवूडमधून चक्क एका सिंगरचे कुत्रे चोरी झाल्याची बातमी समोर आली आहे.

बुधवारी (२४ फेब्रुवारी) चोरांनी पॉप सिंगर लेडी गागा हिचे कुत्रे फिरवणाऱ्या व्यक्तीला गोळी मारली होती. त्यानंतर ते फ्रेंच बुलडॉग प्रजातीचे दोन कुत्रे घेऊन फरार झाले. माध्यमातील वृत्तानुसार, लेडी गागा हिने या आपल्या कुत्र्यांवर ५ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ३ कोटी ६५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

कुत्रे फिरवणारा व्यक्ती रायन फिशर गंभीर जखमी झाला आहे. लॉस एंजलिस पोलिसातील चोरी-खून विभागातील कमांडिंग ऑफिसर कॅप्टन जोनाथन यांच्यानुसार, “डॉग वॉकर घटनेवेळी लेडी गागा हिचे तीन कुत्रे फिरवत होता. त्यादरम्यान दोन संशयितांनी वाहनातून बाहेर येत पीडिताला बंदूकीचा धाक दाखवत कुत्री फिरवण्याची मागणी केली. पीडित व्यक्तीने संशयितांबरोबर संघर्ष केला आणि एका संशयिताने त्याला गोळी मारली. एक कुत्रा पळून जात होता. त्या कुत्र्याला सुरक्षितरीत्या पकडले आहे.”

लेडी गागाच्या हरवणाऱ्या कुत्र्यांची नावे ‘कोझी’ आणि ‘गुस्ताव’ असे आहे. घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या तिसऱ्या कुत्र्याचे नाव ‘एशिया’ असे आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी ईमेल पत्ताही ([email protected]) जारी करण्यात आला आहे.

लेडी गागा आपल्या पाळीव कुत्र्यांसोबतचे फोटो नेहमी शेअर करत असते.

महाग आणि प्रतिष्ठित जातीचे कुत्रे
खरं तर फ्रेंच बुलडॉग हे महागडे आणि प्रतिष्ठित जातीचे कुत्रे असतात. त्यांची किंमत हजारो डॉलर्समध्ये असते. लेडी गागाच्या कुत्र्यांना निशाना का बनवले गेले, याबाबत आतापर्यंत माहिती मिळाली नाही.

लेडी गागाच्या प्रवक्त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गागा सध्या शूटिंगसाठी रोममध्ये आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चुरा के दिल मेरा गोरिया चली’, शिल्पा शेट्टीचा मालदीवमध्ये दिसला बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज

-‘दंगल’ चित्रपटातील ‘बबिता’ने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आजमावले होते डान्समध्ये आपले नशीब, आता आहे आघाडीची अभिनेत्री

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.