मराठीतील गाजलेल्या मालिकांबद्दल विषय निघाला, तर ‘लागीर झालं जी’ या मालिकेचं नाव येणार नाही, असं होऊच शकत नाही. या मालिकेने प्रेक्षकांना देशभक्तीच्या आड लपलेल्या प्रेमकथेचे दर्शन घडवून दिले. ‘आज्या’ आणि ‘शितली’ या मुख्य व्यक्तीरेखा प्रचंड गाजल्या. मालिका संपून बराच काळ लोटला असला तरीही, प्रेक्षकांच्या मनात अजूनही यातील पात्रं जिवंत आहेत.
यातील आज्या अर्थातच अभिनेता नितीश चव्हाण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. ऑनस्क्रीन तो जितका हिट ठरला, तितकाच तो सोशल मीडियावरही आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण तो दरदिवशी त्याचे व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे खूप मनोरंजन करत असतो. नुकत्याच त्याने शेअर केलेला डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
हा व्हिडिओ स्वतः नितीशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने अतिशय मजेदार पद्धतीने डान्स केला आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स पुन्हा पुन्हा पाहाव्या वाटतात आणि म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. नितीशचा हा मजेदार अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.
विशेष म्हणजे, नितीशने या डान्सला आज्या डान्स म्हणून नाव दिले आहे. होय, हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘आज्या डान्स’ असे लिहिले आहे. चाहत्यांनाही हा डान्स खूप आवडला आहे, असे ते कमेंट्सच्या माध्यमातून त्याला सांगत आहेत. शिवाय मालिका संपल्यापासून चाहते त्याला किती मिस करत आहेत, हेही ते कमेंटमध्ये सांगत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘पुन्हा अभिनेत्रीसोबच डान्स केला तर धुलाई करेन…’ अंशुमन विचारेच्या लाडकीने दिली त्याला धमकी
-‘जलपरी’ बनून सारा अली खानने मारली होती समुद्रात उडी; व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा पाहाच