‘जलपरी’ बनून सारा अली खानने मारली होती समुद्रात उडी; व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा पाहाच


आजकाल सगळेच सोशल मीडियावर सक्रिय असते. यातच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी मुलगी सारा अली खान देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या फोटोमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नेहमीच तिचे काम संपल्यावर फिरायला जात असते. कधी तिचा भाऊ इब्राहिम खान, तर कधी आई अमृता सिंगसोबत एन्जॉय करताना दिसत असते. काही दिवसांपूर्वी ती काश्मीर मधून एन्जॉय करून परतली आहे. तिच्या या सुट्ट्या दरम्यान ती खूपच चर्चेत होती. त्यांनतर ती तिचा भाऊ आणि आई सोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली होती.

सारा अली खान मागच्या वर्षाच्या सुरुवातीला इब्राहिम खान आणि अमृता खानसोबत मालदीवला सुट्ट्या‌ एन्जॉय करायला गेली होती. तिने तेथील अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या दिवसात तिचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती पांढरी बिकिनी घालून समुद्रात फिरताना दिसत आहे.

यासोबतच सारा अली खानने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जहाजातून उडी मारून समुद्राच्या आत जाताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “जलपरी मैं चली.”
तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूपच आवडला आहे. सगळेजण कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहे.

सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘कुली नंबर १’मध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट


Leave A Reply

Your email address will not be published.