Friday, December 8, 2023

‘ढोल कुणाचा वाजं जी…!’ गाण्याचा तालावर झोका घेताना दिसली अनुष्का सरकटे; ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओला चाहत्यांची पसंती

‘झी मराठी चॅनल प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येतच आहे. काही दिवसांपूर्वीच चॅनलवर आलेली ‘कारभारी लयभारी’ ही नवीन मालिका टीव्ही जगात धुमाकूळ गाजवत आहे. मालिका आणि यातील कलाकार अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. यात मुख्य भूमिकेत निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे झळकत आहेत. या दोघांची जोडी आणि अभिनय प्रेक्षकांकडून चांगलाच पसंतही केला जात आहे.

अभिनेत्री अनुष्का सरकटेला तिच्या भूमिकेसाठी खूप प्रेम मिळत आहे. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सतत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या पोस्ट्स चाहत्यांकडूनही बऱ्याच पसंत केल्या जातात. आता नुकताच अनुष्काने शेअर केलेला एक व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हा एक ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओ आहे, जो अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ हे जुनं गाणं वाजत आहे. तर अभिनेत्री हे गाणं गुणगुणत झोका घेताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओमध्ये सर्वत्र झाडेझुडपे दिसत आहेत. त्यापैकीच एका झाडावर अनुष्का झोके घेत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ढोल कुणाचा वाजं जी…!” नेटकऱ्यांना हा व्हिडिओ आवडल्याचे ते कमेंट्सच्या माध्यमातून सांगत आहेत. तसेच व्हिडिओला १० हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे.

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने आत्तापर्यंत तीन मालिका केल्या आहेत. ‘कारभारी लयभारी’ ही तिची तिसरी मालिका आहे. याआधी तिने ‘मी तुझीच रे’ आणि ‘लक्ष्मीनारायण’ या मालिकांमध्ये काम केले होते. यातील लक्ष्मीनारायण मालिकेतील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. यात तिने लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन भुमिका केल्या होत्या. ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होतं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

हे देखील वाचा