Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड हजारो गाणी गायलेल्या लता दीदींच्या नावे आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेला ‘हा’ विक्रम

हजारो गाणी गायलेल्या लता दीदींच्या नावे आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेला ‘हा’ विक्रम

‘तुम मुझे यु भूल ना पायोगे’ नक्कीच ‘हा’ आवाज असा होता, जो कोणी कधीच विसरू शकणार आहे. आज ती सर्वच लोकं स्वतःला नशीबवान समजत असतील ज्यांनी लता मंगेशकर यांना लाईव्ह गाताना ऐकले, त्यांच्यासोबत काम केले. याशिवाय सर्वच सामान्य लोकं ज्यांना त्यांचा प्रवास बघता आला, त्यांची गाणी लाईव्ह ऐकता आली. आज लता मंगेशकर यांच्या निधनामुळे खरंच एका युगाचाच अंत झाला आहे. त्या कायमच त्यांच्या गाण्यांनी आपल्यासोबत असतील. त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान कोणत्याही मापात मोजले जाऊ शकणार नाही. इतके मोठे आणि भव्य आहे. संगीत क्षेत्रातील खरा सुरांचा ध्रुव तारा आज निखळला. मात्र दीदींनी त्यांच्या आयुष्यात असे महान कर्तृत्व केले की, ज्यामुळे त्या कधीच विस्मरणात जाणार नाही. दीदींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत असंख्य गाणी गायली. त्यांच्या गाण्याची संख्या पाहून त्यांच्यावर एक रेकॉर्ड देखील झाले.

लता मंगेशकर यांच्या नावावर संपूर्ण भारतीयांना अभिमान आणि आश्चर्य वाटावे असे अनोखे रेकॉर्ड नोंदवले गेले होते. दीदींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. एका मागोमाग एक गाणी गाणाऱ्या लता दीदींच्या नावे हा विक्रम असायला पाहिजे एवढी गाणी त्यांनी गायली होती. जवळपास ३६ भाषांमध्ये, ९०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये २५ हजारपेक्षा अधिक गाणी त्यांनी गायली आणि त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. मात्र त्यांच्या या दाव्याला दिग्गज गायक मोहम्मद रफी यांनी आव्हान दिले होते.

त्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लता दीदींच्या नावाचा समावेश तर झाला, सोबतच मोहम्मद रफी यांचा दावा देखील छापला गेला होता. पुढे १९९१ मध्ये लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांची नावे वगळण्यात आली होती. पुढे २०११ साली लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांनी दीदींचा हा विक्रम मोडला. त्यानंतर आशा भोसले यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. आशा भोसले यांनी २० भाषांमध्ये अकरा हजार सोलो, डूयट आणि कोरस गाणी गायली असल्याचे अधिकृतपणे नोंदवले गेले आहे. मात्र, आता हे शीर्षक दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील गायिका पुलपाका सुशीला यांच्या नावावर नोंदवण्यात आले आहे. २००१ मध्ये ता दीदींना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा