Friday, December 8, 2023

लता मंगेशकर यांनी थेट ‘सीआयडी’मधील एसीपी प्रद्युमनवर रोखली होती बंदूक, वाचा रंजक किस्सा

आपल्या जादूई आवाजाने भारतीय संगीत जगताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या गायिकांमध्ये लता मंगेशकर यांचे नाव घेतले जाते. ज्या आवाजाने तब्ब्ल 7 दशकांच्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन केलेल्या लता दीदींनी वयाच्या 93 वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता दीदी जरी आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी सदैव आपल्याला त्यांची आठवण करून देतील. लता मंगेशकर यांनी संपूर्ण जगात हिंदी गाण्यांना ओळख मिळवून दिली, मात्र त्यांनी फक्त हिंदी नाही तर भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमधील गाण्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. आज (28, सप्टेंबर) लता मंगेशकर यांची जयंती जाणून घेऊया त्यांच्या संगीत प्रवासाबद्दल.  त्यांनी एकदा ‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युमनवर बंदूक उभारली होती. काय आहे हा मजेशीर किस्सा चला जाणून घेऊ.

गाण कोकिळा लता मंगेशकर या संगीत क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व होत्या. आपल्या जादुई आवाजाने त्यांनी तब्बल सात दशके संगीत क्षेत्रात काम केले. त्यांच्या या कार्यामुळेच संपूर्ण देशातून असंख्य चाहते तयार झाले होते. लता दीदींना चित्रपटासह टीव्ही मालिका पाहायला खूप आवडत होत्या. विशेष म्हणजे, त्या ‘सीआयडी’ मालिकेच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. त्यांना अशा प्रकारच्या रहस्यमय मालिका बघण्यात रस होता. ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांचे त्या नेहमी कौतुक करायच्या. एकदा त्यांनी या मालिकेतील सर्व कलाकारांना आपल्या घरी बोलावले होते. यावेळचा खूप मजेशीर किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.

लता मंगेशकर यांनी आपल्या पेडर रोडवरील निवासस्थानी ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांना भेटायला बोलावले होते. मालिकेतील शिवाजी साटम, दया शेट्टी आणि अभिजीत असे प्रमुख कलाकार यावेळी त्यांना भेटायला आले होते. यावेळी आनंदून गेलेल्या लता दीदींनी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या होत्या. त्यांनी त्यावेळी एसीपी शिवाजी साटम यांची बंदूक घेऊन त्यांच्यावरच रोखली होती. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या मालिकेला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी लता मंगेशकर यांच्यासाठीही एक भाग प्रदर्शित केला होता, जो त्यांना खूप आवडला होता.

एका मुलाखतीत सीआयडी मालिकेबद्दल बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, “मी हा कार्यक्रम नेहमी बघते. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे शिवाजी साटम नेहमी माझ्या घरी येतात. त्यावेळी आम्ही या कार्यक्रमाविषयी चर्चा करतो.” कार्यक्रमाने 19 वर्ष पूर्ण केले असून, तो 50 वर्ष चालावा अशी इच्छाही यावेळी त्यांनी बोलून दाखवली होती.

लता मंगेशकर यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अस्त झाला आहे. त्यांनी आपल्या आवाजाने देशाचे नाव सर्वत्र उंचावले होते. त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

 

हेही वाचा-
मित्राकडून उसने पैसे घेऊन केला पहिला सिनेमा, आज मराठी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक, आहेत महेश कोठारे
रणबीर कपूरची एका महिन्याची कमाई पाहून व्हाल थक्क, करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे आलियाचा नवरा

हे देखील वाचा