Tuesday, March 5, 2024

सिद्धू मूसेवालाचे ‘वॉर’ हे दुसरं गाणं रिलीज; चाहते म्हणाले,’सिद्धू आता…’

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला(Siddhu Moosewala) आता आपल्यामध्ये नसला तरी त्यांचे प्रत्येक गाणं चाहत्यांच्या ओठावर आहे. सिद्धू मूसेवालाचं यांचे बहुप्रतिक्षित ‘वॉर’ हे गाणं गुरुपर्वच्या शुभ मुहूर्तावर रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याच्या रिलीजची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. गायकाचे शेवटचे गाणे SYL होते जे त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज झाले. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याला 25 दशलक्ष व्ह्यूज मिळाल्यानंतर यूट्यूबवरून बॅन करण्यात आले.

मूसवालाचे गाणे मंगळवारी रिलीज झाले
सोमवारी मूसेवालाच्या गाण्याचे वार रिलीज झाल्याची बातमी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली. गाण्याचे पोस्टर शेअर करताना, दिवंगत गायक सिद्धू मूसेवालाच्या टीमने लिहिले की, “आम्ही सर्वजण आमच्या आधी आलेल्या लोकांना घेऊन जातो.” मंगळवारी हे गाणे रिलीज करताना त्यांनी लिहिले, ‘जोपर्यंत सिंहांना स्वतःचे इतिहासकार नसतील तोपर्यंत शिकारीचा इतिहास शिकारीचा गौरव करेल. आता वार खेळत आहे..!”. त्याचवेळी सिद्धू मूसेवालाच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झालेल्या या गाण्याला अवघ्या एका तासात 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सिद्धू मूसेवालाचे चाहते सध्या या गाण्याच्या रिलिमुळे खूप आनंदी आहेत.

 

View this post on Instagram

 

हे गाणे रिलीज झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुरू झाले आहे आणि दिवंगत गायकाचे चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत, एकाने लिहिले कि, “त्याच्या पालकांचे आभार, त्याचे संगीत ऐकण्यात आणि आपल्या सभोवतालचे त्याचे अस्तित्व अनुभवण्यात आम्ही धन्य झालो आहोत. कृपया त्याचे गाणे लीक करू नका जेणेकरून आम्ही त्याची निर्मिती योग्यरित्या ऐकू शकू.” दुसर्‍याने कमेंटमध्ये लिहिले, “सिद्धू आता शारीरिकदृष्ट्या आमच्यासोबत नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.”

सिद्धू मूसेवाला यांची मे29 रोजी हत्या झाली 
सिद्धू मूसेवाला यांची 29 मे 2022 रोजी पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येवर देशभरातील राजकारणी, बॉलिवूड, क्रिकेटपटू आणि इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेश-जेनिलिया यांच्या चित्रपटाची नवी रिलीझ डेट आली समोर, ‘या’ दिवशी पडद्यावर येणार ‘मिस्टर मम्मी’
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! सुनील शेट्टीच्या ‘धारावी बँक’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा