Wednesday, June 18, 2025
Home बॉलीवूड रितेश-जेनिलिया यांच्या चित्रपटाची नवी रिलीझ डेट आली समोर, ‘या’ दिवशी पडद्यावर येणार ‘मिस्टर मम्मी’

रितेश-जेनिलिया यांच्या चित्रपटाची नवी रिलीझ डेट आली समोर, ‘या’ दिवशी पडद्यावर येणार ‘मिस्टर मम्मी’

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा(Genelia Dsouza) सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून या जोडीकडे पाहिले जाते. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. तेरे नाल लव्ह हो गया नंतर आता ते मिस्टर मम्मी या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

रितेश देशमुख आणि जेनिलियाने त्यांच्या आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत घोषणा केली होती. यातील रितेशचा फर्स्ट लूक बघून काहींनी त्याला ट्रोल केले होते. या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर फारच मजेशीर असल्याचे पाहायला मिळत आहे. यात जेनिलिया आणि रितेश दोघंही गरोदर असल्याचं दाखवण्यात येत आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

मिस्टर मम्मी चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलून 18 नोव्हेंबर करण्यात आली आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे 11 नोव्हेंबर रोजी अजय देवगण आणि तब्बू यांचा बहुप्रतीक्षित ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने या चित्रपटाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला असल्याचे समोर आले आहे.

दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवण्याची इच्छा
‘मिस्टर मम्मी’ने मन जिंकण्यासोबतच रितेश देशमुख आता अभिनयासोबत दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. मराठी चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. अलीकडेच त्याने आपल्या नवीन प्रवासाची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, ’20 वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर मी पहिल्यांदाच त्याच्या मागे उभे राहण्यासाठी म्हणजेच दिग्दर्शनासाठी मोठी झेप घेतली आहे. मी माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत असल्याने मी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो. या प्रवासाचा एक भाग व्हा, वेड (मॅडनेस).’ अभिनेत्याने चित्रपटाचे तीन पोस्टर देखील शेअर केले ज्यामध्ये समुद्रात बोट दिसत आहे.

‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करणार आहे. भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख, महेश मांजरेकर हे कलाकार दिसणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! सुनील शेट्टीच्या ‘धारावी बँक’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

अय्याे! असे काय घडले की, उर्फी दिसली बॅंडेज पट्टीमध्ये गुंडाळलेली

हे देखील वाचा