लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुटुंबाने केली स्वप्नपूर्ती, खेड्यापाड्यातील कलाकारांना मिळणार मोठी संधी


मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)यांची नुकतेच गुरुवारी (१६ डिसेंबर) रोजी १७ वी पुण्यतिथी झाली आहे. १६ डिसेंबर २००४ साली त्यांचे निधन अकाली निधन झाले आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीवर दुःखाचे सावट पसरले. एक होतकरू कलाकार गेल्याने त्याच्या चाहत्यांसोबत संपूर्ण चित्रपटसृष्टीला दुःखद धक्का बसला होता. अशातच त्यांच्या सतराव्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी एक निर्णय घेतला आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे (Priya Berde) आणि मुले अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि स्वानंदी बेर्डे (Swanadi Berde) यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने ‘लक्ष कला मंचा’ची स्थापना केली आहे. याची माहिती प्रिया, स्वानंदी आणि अभिनय या तिघांनीही सोशल मीडियावर दिली आहे. प्रिया बेर्डे यांनी या मंचाचा एक पोस्टर शेअर करून लिहिले आहे की, “कलेवरच्या प्रेमासाठी आणि कलाकारांच्या हक्कासाठी लक्ष्य कला मंच.” (laxmikant berde’s dream will come true berde family made big announcement)

यासोबत अजय परचुरे यांनी कार्यक्रमाचे फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आवडते कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज १७ वा स्मृतिदिन. लक्ष्यामामा अजूनही आपल्याला दररोज आठवत असतो, कारण त्याने त्याच्या कलाकृतीतून दिलेला आनंद आपण कधीच विसरू शकत नाही. पण आजचा दिवस खरच खूप खास आहे कारण प्रिया, अभिनय आणि स्वानंदी यांनी पाहिलेले १७ वर्षांपासूनच स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. या तिघांनी आपल्या अथक मेहनतीतून लक्ष्य कला मंचाची स्थापना केली आहे.”

फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

त्यांनी पुढे लिहिले की, “या मंचांच प्रमुख उद्दिष्ट आहे, खेडोपाड्यात असणाऱ्या उत्तम कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, लक्ष्या मामाने हजारो कलाकारांना घडवलं, त्यांना या इंडस्ट्रीमध्ये ठामपणे स्थिरावण्याची ताकद दिली. प्रसंगी काही कलाकारांना आर्थिक मदत करत त्यांच्यातील आत्मविश्वास ढळू दिला नाही. लक्ष्या मामाच तेच स्वप्न आता बेर्डे कुटुंबीय पुढे घेऊन जात आहे. प्रिया, अभिनय, स्वानंदी तुमचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम खरच खूप मोठा होऊ दे या शुभेच्छा आणि तुम्ही सुरू केलेल्या या मंचाला आणि तुम्हाला माझा सलाम. आम्ही सगळेच कलेवर प्रेम करणारे, लक्ष्या मामावर नितांत प्रेम करणारी मंडळी तुमच्यासोबत कायम आहोत.”

अनेकजण या पोस्टवर कमेंट करून बेर्डे कुटुंबाचे अभिनंदन करत आहेत. यामुळे आता अनेक खेड्यातील कलावंतांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा :

‘मी आता माझ्या बायोमध्ये आयएमडीबी लिंक टाकू का?’ निक जोनासची पत्नी उल्लेख करताच भडकली देसीगर्ल

‘तैमुरसोबत पण काम करणार का?’, कपिल शर्माच्या प्रश्नावर अक्षय कुमारने दिलं मजेशीर उत्तर

‘ही’ बॉलिवूड मंडळी आहे जॉन अब्राहमची कट्टर दुश्मन, एकाने तर केलाय करिअर संपवण्याचा प्रयत्न

 

 


Latest Post

error: Content is protected !!