‘तैमुरसोबत पण काम करणार का?’, कपिल शर्माच्या प्रश्नावर अक्षय कुमारने दिलं मजेशीर उत्तर

‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) दर आठवड्याला कलाकार त्यांच्या आगामी चित्रपट किंवा वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी येतात, ज्यामध्ये कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची टीम त्यांच्यासोबत खूप मजामस्ती करताना दिसतात. तर या आठवड्यात अक्षय कुमार (Akshay Kumar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि दिग्दर्शक आनंद एल राय त्यांच्या आगामी ‘अतरंगी रे’ (Atarangi Re) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

‘अतरंगी रे’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय आणि सारासोबत या चित्रपटात टोलिवूडचा सुपरस्टार धनुषही (Dhanush) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या अक्षयने या शोमध्ये प्रेक्षकांना जादूच्या ट्रिक्सही दाखवल्या. ज्या पाहून सर्वच चकित झाले. (kapil sharma asks if akshay kumar will be seen with taimur ali khan in film watch actor reply)

तैमुरसोबत करणार काम
शोचा लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार जादूच्या ट्रिक्स दाखवताना दिसत आहे. यानंतर कपिल येतो आणि म्हणतो की, “पूर्वी मला वाटायचे की पाजीचे चित्रपट आमच्या शोमध्ये येतात, पण आता मला वाटते की आमचा शो पाजींच्या चित्रपटांमध्ये येतो.”

जेव्हा सारा अली खान शोमध्ये एन्ट्री करते, तेव्हा कपिल अक्षयची मस्करी करत विचारतो की, “तुम्ही शर्मिला टागोरसोबत काम केले आहे, त्यांचा मुलगा सैफ अली खानसोबत काम केले आहे, आता तुम्ही सारा अली खानसोबतही सोबत काम करत आहात. अशात आम्ही ऐकले आहे की, तुमच्याकडे एक स्क्रिप्ट आहे ज्यामध्ये तैमूर सोबत आणि त्यावेळच्या त्याच्या हिरोईनसोबत लव्ह ट्रँगल करणार आहात. हे खरे आहे का?” कपिलच्या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय म्हणतो की, “मला तैमूरच्या मुलासोबतही काम करायचे आहे.”

विकी- कॅटरिनाच्या लग्नाची उडवली टिंगल
किकू शारदा शोमध्ये येतो आणि म्हणतो की तो अलीकडेच राजस्थानमध्ये एका हाय प्रोफाईल लग्नाला गेला होता. तो म्हणतो की, “असे लग्न मी आयुष्यात पाहिले नाही, कारण त्यांनी मला पाहूच दिले नाही.” शब्दांशी खेळत तो म्हणतो, “पण खूप कौशल्य-मंगल करून लग्न झाले.” यावर अक्षय म्हणतो की, “तू तिथे किट-कॅटही खाल्ले असेल.”

ही मजामस्ती पाहून हा एपिसोड धमाकेदार असणार हे नक्कीच!

हेही वाचा :

Latest Post