Thursday, June 13, 2024

‘अॅनिमल’च्या सेटवरून रणबीर कपूरचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या ‘तू झुठी मैं मक्कार‘ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 2023 मधील ‘पठाण’ नंतर  हा दुसरा चित्रपट होता, ज्याचे बाॅक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन झाले. या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर रणबीर ‘अ‍ॅनिमल’साठी चर्चेत आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या या चित्रपटाबाबत लोकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक क्लिप समोर आली आहे.

खरे तर, या चित्रपटातील रणबीर (ranbir kapoor) याचा नवा लूक चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर चाहते त्याच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीर एका वर्गात उभा असलेला दिसत आहे, जाे विद्यार्थ्याच्या गणवेशात आहे आणि त्याच्या शिक्षकांशी बोलत आहे.

रणबीर कपूर युनिव्हर्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही काही सेकंदांची क्लिप आहे, ज्यामध्ये रणबीरचा क्लीन शेव्हन स्टुडंट लूक लोकांना आकर्षित करत आहे. रणबीर वयाच्या 40व्या वर्षीही खूप गोंडस आहे, असे चाहत्यांचे मत आहे.

या सगळ्यात ‘अ‍ॅनिमल’च्या सेटवरून लीक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी मागच्या वर्षीच्या शूट शेड्यूलचा असल्याचा दावा केला आहे. मात्र, हे पाहून लोकांमध्ये हा चित्रपट पाहण्याचा उत्साह आणखीच वाढला आहे.

रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट एका गँगस्टर कुटुंबाची कथा आहे. या चित्रपटात अनिल कपूर देखील आहे, जाे रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि शक्ती कपूर हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘अॅनिमल’ हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.(leaked video of actor ranbir kapoor from set of animal actor looks goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! कार्तिक अन् कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

कॅन्सरचे निदान झाल्याच्या बातम्यांवरून चिरंजीवी संतापले मीडियावर, जाणून घ्या काय म्हणाले अभिनेता

हे देखील वाचा