Friday, December 8, 2023

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! कार्तिक अन् कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा टीझर आणि गाणे ‘नसीब से‘ रिलीज झाले आहे. याशिवाय चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी एक नवीन पोस्टर समोर आले आहे, ज्यामध्ये निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.

कार्तिक आर्यन (kartik aaryan) याने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये कार्तिक आणि कियारा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. पोस्टरमध्ये, कियारा कार्तिकच्या छातीवर लेटलेली दिसत आहे आणि दोघे प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले, ‘आज के बाद तू मेरी रहना. सत्यप्रेम की कथाचा ट्रेलर उद्या 11.11 वाजता प्रदर्शित होणार आहे.’ अशाप्रकारे ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट सोमवारी म्हणजेच 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर येताच चाहते उत्साहित झाले आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, ‘शेवटी ट्रेलर उद्या रिलीज होत आहे.’, तर दुसर्‍याने लिहिले, ‘आता चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

समीर विद्वांस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे नाव आधी ‘सत्यनारायण की कथा’ असे होते, परंतु त्याच्या शीर्षकावरून झालेल्या वादामुळे त्याचे नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असे ठेवण्यात आले आहे. मंडळी, हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर कार्तिक ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘आशिकी 3’, ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, कियारा अडवाणी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘गेम चेंजर’ चित्रपटात दिसणार आहे.(bollywood actor kartik aaryan and kiara advani film satyaprem ki katha trailer will be released on 5th june)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोरोना काळात गमावलेला जादूई आवाज,एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर होता ‘हा’ विश्वविक्रम

कॅन्सरचे निदान झाल्याच्या बातम्यांवरून चिरंजीवी संतापले मीडियावर, जाणून घ्या काय म्हणाले अभिनेता

हे देखील वाचा