Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल अमरिश पुरींच्या नातवाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘बरेच लोक थेट लैंगिक सुखाची…’

बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल अमरिश पुरींच्या नातवाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘बरेच लोक थेट लैंगिक सुखाची…’

बॉलिवूडसारखी झगमगणारं जग अनेकांना आपवल्याकडे आकर्षित करत असतं. मात्र, जेवढी सुंदरता वरुन दिसते तेवढेच आतमधील गुपितही भयानकच असतात. हॅशटॅग मी टू चळवळ, कास्टिंग काऊच हे शब्द कलाक्षेत्रामध्ये काही नवीन नाहीत. इंडस्ट्रीमझध्ये काम मिळण्यासाठी लौगिंक शोषणाचा सामना कारावा लागतो हे आपण अनेकदा अभिनेत्रींकडून जास्त ऐकलं आहे मात्र, रणवीर सिंग, आयुष्मान खुराना यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांना देखिल अशा गोष्टींचा सामना करावा लागला आहे. एवढंडच काय बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अमरिश पुरी यांचा नातू वर्धान पुरी याला देखिल याचा सामना करावा लागला आहे.

बॉलिवूडमधील खलनायकी भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात मोलाचे स्थान निर्माण करणारे अमरिश पुरी (Amrish Puri) यांचा नातू वर्धान पुरी (Wardhan Puri) याने देखिल 2019 साली प्रदर्शित झालेला ‘ये साली आशिकी’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला या चित्रपटाद्वारे फार काही यश मिळाले नाही. या चित्रपटानंतर त्याच्याकडे  3 चित्रपट होते मात्र, कोरोनमुळे हे चित्रपट बनलेच नाही. वर्धाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान  इंडस्ट्रीबद्दलचा अनुभव सांगितला आहे.

वर्धाने अभिनयातच नाही तर साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. त्यावर त्याने सांगितले की, “इंडस्ट्रीमधील बरेच लोक तुमच्याकडे थेट लैगिंक सुखाची मागणी करतात. काही म्हणतात की, तु मला एवढे पैसे दे मग मी तुला काम देईल. काही लोकं म्हणतात की, मी तुला असा व्यकीची ओळख करुन देतो जो तुझ्यासाठी चित्रपट लिहित आहे. मात्र, ती व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये कोणालाच ओळखत नसते. त्याशिवाय ती व्यक्ती इंडस्ट्रीचा भाग देखिल नसते. ती व्यक्ती फक्त स्वतःची चांगली प्रतिमा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते.”

 

View this post on Instagram

 

वर्धाने त्याच्या अनुभवासोबतच इंडस्ट्रीमधील अनेक गुपितही बाहेर आनले आहेत, वर्धान सध्या 32 वर्षाचा असून त्याने अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली होती. ‘दावत-ए-इश्क, ‘इशकजादे‘, आणि ‘शुद्ध देसी रोमान्स‘ गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याने साहाय्यक भूमिका देखिल निभावल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा