दिग्गज गायिका आशाजींना लहानपणापासूनच शिकायचा होता डान्स, स्पर्धकाला आपल्या अंदाजात दिले रिलेशनशिपचे सल्ले


‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ (Indias Best Dancer 2) मध्ये बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले (Aasha bhosale) खास पाहुण्या म्हणून दिसणार आहेत. या आगामी भागाची काही झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शोमध्ये त्या फक्त गाणेच गाणार नाही, तर शोचे परीक्षक मलायका अरोरा (Malaika Arora) टेरेन्स लुईस (terence lewis) आणि गीता कपूर (Geeta Kapoor) यांच्यासोबत डान्स करतानाही दिसणार आहेत. आशा पहिल्यांदाच एका डान्स रिऍलिटी शोमध्ये दिसल्या. ८८ वर्षीय आशा या शोमध्ये खूप मस्ती करताना दिसल्या आहेत.

आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये त्या एका स्पर्धकाला हार्टब्रेक झाल्यानंतर रिलेशनशिपचा सल्ला देताना दिसत आहेत. प्रोमो शेअर करताना सोनीने लिहिले की, “केवळ सुरांच्या बाबतीतच नाही, तर आशा जी रिलेशनशिपमध्येही मास्टर आहेत. त्यांचा हृदयस्पर्शी सल्ला पाहा.”

शोमध्ये स्पर्धकांना दिला रिलेशनशिपचा सल्ला
प्रोमोमध्ये ज्येष्ठ गायिका आशा यांचे जोरदार स्वागत होताना दिसत आहे. स्पर्धक रक्तीम ठाकुरियाशी बोलताना त्या म्हणतात की, कोणीतरी सांगितले की, “त्याच्या प्रेमात काहीतरी गडबड झाली आहे आणि त्याला ब्रह्मचारी राहायचे आहे.” शोचा होस्ट मनीष म्हणतो की, “त्याचे प्रेम दुसऱ्यासोबत जाते.” हे ऐकून आशा इतर लोकांसोबत हसायला लागतात. अशा परिस्थितीत मनीष आशा यांना रिलेशनशिपबद्दल सल्ला देण्यास सांगतो. आशा यांनी ‘सत्ता पे सत्ता’ मधील ‘झुका के सर को पूछो’ हे गाणे गायले आहे. त्या पुढे म्हणतात की, “असे बोलला तर मुलगी कुठेही जाणार नाही.”

‘लहानपणापासून डान्स शिकण्याची इच्छा होती’
आशा यांना इंडस्ट्रीत ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा परिस्थितीत सोनीने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये हा खास दिवस साजरा करण्याची योजना आखली आहे. आशा या शोमध्ये निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहेत. शोमध्ये त्यांनी ऋतिक रोशनच्या गाण्यांवर सिग्नेचर स्टेप देखील केल्या होत्या. आशा सांगतात की, मला “लहानपणापासून डान्स शिकण्याची इच्छा होती.”

आशा भोसले यांनी १९४३ मध्ये ‘माझा बाल’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला नव बला’ या गाण्यातून त्यांनी पदार्पण केले. त्यांनी जवळपास १२ हजार गाणी गायली आहेत. त्या आरडी बर्मन यांच्या पत्नी आणि लता मंगेशकर यांची बहीण आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केबीसी’चे १००० एपिसोड्स पूर्ण, पण स्वत:च्या लेकीसमोरच का रडू लागले अमिताभ बच्चन?, व्हिडिओ व्हायरल

-‘बिग बॉस १५’च्या घरात ‘या’ स्पर्धकावर भडकला सलमान खान; म्हणाला, ‘मी आत येतो, मला आपटून…’

-Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’


Latest Post

error: Content is protected !!