‘केबीसी’चे १००० एपिसोड्स पूर्ण, पण स्वत:च्या लेकीसमोरच का रडू लागले अमिताभ बच्चन?, व्हिडिओ व्हायरल


टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ मधील मागील एपिसोड खूपच खास होता. या शोमध्ये सामान्य नागरिकांपासून ते अनेक कलाकार हॉट सिटवर बसले आहेत. परंतु या शुक्रवारी (३ डिसेंबर) रोजी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये काही खास क्षण पाहायला मिळाले आहेत. या शुक्रवारी या शोला १००० एपिसोड पूर्ण झाल्याने खास क्षण साजरे झाले आहेत. या खास प्रसंगी केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि नात नव्या नवेली नंदा आल्या होत्या. तसेच जया बच्चन यांनी देखील या शोमध्ये ऑनलाईन उपस्थिती दर्शवली होती.

या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी केवळ त्यांच्या कुटंबीयांसोबत खेळ खेळला नाही, तर अनेक किस्से देखील सांगितले. तसेच या शोमध्ये अनेक वर्षापासून त्यांनी होस्टची भूमिका निभावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात ते भावुक झाले. (Kaun Banega crorepati show complete 1000 episodes amitabh bachchan revealed the reason for becoming the host of the show)

यावेळी एका या व्हिडिओमधून या शोचा २१ वर्षाचा प्रवास प्रेक्षकांना दाखवला आहे. तब्बल २ दशकांपासून चालू असणाऱ्या या शोने यश प्राप्त केले आहे. हा २१ वर्षाचा प्रवास पाहून अमिताभ बच्चन खूप भावुक झाले. तसेच जया बच्चन यांनी सांगितले की, हा शो बंद करू नका. तसेच सगळा प्रवास पाहून अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी अमिताभ बच्चन यांनी होस्ट बनण्यामागची एक कहाणी सगळ्यांना सांगितली. त्यांनी असे सांगितले की, “जेव्हा मी चित्रपटातून टेलिव्हिजनकडे येत होतो, तेव्हा लोकांनी मला असे न करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचे असे म्हणणे होते की, याने माझ्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. त्यावेळी माझी देखील काही कारणं होती. मला त्यावेळी चित्रपटात काम मिळत नव्हते, तेव्हा मी टेलिव्हिजनवर येण्याचा निर्णय घेतला.”

या खास एपिसोडमध्ये नव्या नवेलीने सांगितले की, ती आरती नायकसाठी हा खेळ खेळत आहे आणि मिळालेली सगळी रक्कम ती त्यांचे एनजीओ सखी फाऊंडेशनला देणार आहे. त्यावेळी तिने सांगितले की, आरती नायक या गरीब मुलांना फ्रीमध्ये शिकवतात. त्यांनी या आधी जवळपास एक हजार मुलांना फ्रीमध्ये शिक्षण दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’च्या घरात ‘या’ स्पर्धकावर भडकला सलमान खान; म्हणाला, ‘मी आत येतो, मला आपटून…’

-Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’

-गेल्या दोन वर्षांपासून ‘या’ आजाराशी झुंज देतेय राणी चॅटर्जी, पोस्ट शेअर करत मांडली व्यथा


Latest Post

error: Content is protected !!