Wednesday, July 3, 2024

इंडियन आयडल १३ च्या निमित्ताने तब्बल ५० वर्षांनी सोबत दिसणार धर्मेंद्र आणि मुमताज यांची हिट जोडी

हिंदी सिनेमातील अतिशय दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे मुमताज. बॉलिवूडमध्ये ७०/८० चे दशक आपल्या अभिनयाने आणि नृत्याने त्यांनी गाजवले. मुमताज या फॅशन दिवा म्हणून देखील गाजल्या. त्यांची साडी नेसण्याची स्टाईल, हेयर स्टाइल, आय लानर स्टाईल सर्वच तुफान गाजले. मागील बरीच वर्षांपासून त्या चित्रपटांपासून आणि मीडियापासून लांब त्यांचे आयुष्य जगत आहे. मात्र लवकरच त्या पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर हजेरी लावताना दिसणार असून त्यांच्या फॅन्ससाठी आणि दर्शकासाठी हा की सुखद धक्का असणार आहे.

‘इंडियन आइडल 13’ या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा शोमध्ये पहिल्यांदाच मुमताज या हीमॅन धर्मेंद्र यांच्यासोबत दिसणार आहे. नुकताच या भागाचा एक प्रोमो सोनी चॅनेलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ७४ वर्षीय मुमताज यांना मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा पाहणे ही सर्वच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या प्रोमोमध्ये धर्मेंद्र आणि मुमताज शोमध्ये पाहुणे म्हणून चालायचे दिसत आहे.

जवळपास ५० वर्षानंतर पहिल्यांदाच मुमताज आणि धर्मेंद्र एकत्र दिसणार आहे. शोचा प्रोमो पाहून प्रेक्षकांमधली उत्सुकता आधीच वाढली असून आता सर्वच लोकं या भागाची आतुरतेने वाट बघत आहे. प्रोमोच्या व्हिडिओमध्ये दिसते की मुमताज यांनी निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला असून, त्यावर गोल्डन बांगड्या आणि केस मोकळे सोडले आहे. या लूकमध्ये त्या कोमलच्या स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. एकेमकांचा हात धरून दोघांनी शोमध्ये एन्ट्री केली.

या प्रोमोमध्ये दिसते की, शोचा सूत्रसंचालक असणारा आदित्य नारायण त्यांची ओळख करून देताना म्हणतो, ” आजचा दिवस दोन कारणामुळे खास आहे. एक तर हिंदी सिनेमातील दोन दिग्गज धर्मेंद्र आणि मुमताज हे ५० वर्षांनी सोबत आले त्यांनी एकत्र दोन सिनेमे केले. ‘लोफर’ आणि ‘झील के उस पार’… दोनीही चित्रपट 1973 मध्ये प्रदर्शित झाले. आणि दुसरे कारण म्हणजे मुमताज या हजारो विनंत्या करून देखील कोणत्याही टीव्ही शोमध्ये गेल्या नाही, मात्र पहिल्यांदाच त्या स्वतःहून या शोमध्ये आपल्या आवडीच्या गायकांना भेटण्यासाठी आल्या आहेत.”

तत्पूर्वी मुमताज या भारतात राहत नाही. त्या सोशलमीडियावर देखील नाही मात्र त्या त्यांच्या मुलीच्या अकाऊंटवरून चाहत्यांच्या संपर्कात असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा