Sunday, July 14, 2024

अरे बापरे! लिओनार्डो डिकॅप्रियोला ‘हॅलो’ म्हटल्याबद्दल रियॅलिटी स्टारला मिळाली ‘इतकी’ मोठी शिक्षा

टेलिव्हिजन रियॅलिटी स्टार जेम्मा कोलेन्सने (Gemma Collins) दावा केला आहे की, लिओनार्डो डी कॅप्रिओने केवळ हॅलो म्हटल्यामुळे तिला यूएस क्लबमधून बाहेर केले होते.

कोलेन्स ही डिकॅप्रियोची खूप मोठा चाहती आहे. तिने एका मुलाखतीत खुलासा केला की, जेव्हा तिने लिओनार्डो डी कॅप्रिओला हॅलो म्हणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला क्लबमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ती पुन्हा कधीच त्या क्लबमध्ये गेली नाही. आता डिकॅप्रिओचा ‘टायटॅनिक’ पुन्हा पाहायला कोलेन्सला आवडणार नाही, हे नक्कीच! मात्र या संपूर्ण प्रकरणात डिकॅप्रिओच्या बाजूने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (leonardo dicaprio kicked out gemma collins from la nightclub for saying hello to him)

कोलेन्स ही तीच रियॅलिटी स्टार आहे जिने तिचा प्रियकर चार्ली किंगसोबत नग्न अवस्थेत ‘टायटॅनिक’ चित्रपटाचा सीन रिपीट केला होता. ‘टायटॅनिक’ या चित्रपटात लिओनार्डोने केट विंसलेटचे नग्न चित्र काढले होते. असाच काहीसा प्रकार कोलेन्ससाठी तिचा प्रियकर चार्लीने केला होता.

पुढील महिन्यात जेम्मा शिकागोमध्ये स्टेज शो करणार आहे. त्याचवेळी, लिओनार्डो डी कॅप्रिओ सध्या कॅमिला मोरोनसोबत डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. कॅमिला मोरोन ही लिओनार्डो डी कॅप्रिओपेक्षा तब्बल २३ वर्षांनी लहान आहे.

टायटॅनिकमधून प्रसिद्ध झाला लिओनार्डो डीकॅप्रियो
लिओनार्डो डिकॅप्रियोला तुम्ही ‘टायटॅनिक’ या चित्रपटातून ओळखत असाल. या चित्रपटाने डिकॅप्रियोला सुपरस्टार बनवले. या चित्रपटात त्याच्यासोबत केट विन्सलेट दिसली होती. ‘टायटॅनिक’ व्यतिरिक्त डिकॅप्रियोने ‘ब्लड डायमंड’, ‘द एव्हिएटर’, ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’, ‘द रेवेनंट’, ‘इनसेप्शन’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा