Wednesday, July 3, 2024

कोणी यूट्यूबर, तर कोणी मॉडेलिंगमध्ये करतंय करिअर; ‘बिग बॉस मराठी’चे स्पर्धक करतायेत ‘अशा’प्रकारे काम

‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय शो आहे. भारतातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षक हा शो बघतात. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील चालू झाला आहे. या शोचे दोन सिझन पूर्ण झाले आहेत. तसेच तिसरा सिझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक या शोची वाट बघत होते. मागील दोन पर्वामध्ये सहभागी झालेल्या अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. कलाकारांनी अभिनयापासून ते मॉडेलिंगपर्यंत अनेक ठिकाणी काम केले आहे. चला तर जाणून घेऊया हे कलाकार सध्या काय करतात…

मेघा धाडे
मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’ १ ची विजेती स्पर्धक आहे. तिने हिंदी बिग बॉसमध्ये देखील प्रवेश केला होता. मेघा अभिनेता विजय पवार, गौरव राजे यांच्या ‘प्लीज चेंज द साँग’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. बिग बॉस मराठीमध्ये आल्यानंतर मेघा मराठी इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय आणि सर्वात जास्त फॉलो केली जाणारी अभिनेत्री बनली आहे. (Let’s know about Marathi bigg Boss contestant professional life)

पुष्कर जोग
‘बिग बॉस’मध्ये येण्या आधीपासूनच पुष्कर जोग हा मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेता होता. अभिनेता असण्यासोबत तो एक निर्माता देखील आहे. तो बिग बॉस १ मध्ये रनरअप विजेता होता. त्याने नुकताच त्याचा एक यूट्यूब चॅनेल लॉन्च केला आहे.

स्मिता गोंदकर
अभिनेत्री आणि मॉडेल स्मिता गोंदकर हिने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. ‘बिग बॉस मराठी’ १ मध्ये दिसलेली स्मिता एक स्टंट बायकर आहे. या आधी तिने शेवटचे २०१९ मध्ये ‘येरे येरे पैसा’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबत ती पुष्कर जोगसोबत ‘मन सून’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

आस्ताद काळे
आस्ताद काळे हा मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. या आधी त्याने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत काम केले आहे. यासोबत त्याने रुपल नंद आणि यशोमन आपटेसोबत ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत काम केले आहे.

किशोरी शहाणे
दिग्गज अभिनेत्री किशोरी शहाणे या सध्या ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेत काम करत आहेत. त्यांनी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये त्यांच्या फिटनेस टिप्स शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

शिवानी सुर्वे
शिवानी सुर्वे ही मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. बिग बॉसनंतर तिने ‘सातारचा सलमान’ आणि ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच हाती आलेल्या माहितीनुसार, ती स्वप्नील जोशीसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे.

सई लोकुर
बॉलिवूड अभिनेत्री सई लोकुरने कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मासोबत ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली आहे. लॉकडाऊन दरम्यान तिने अनेक रेसिपी तसेच स्किनकेअर टिप्स देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

शर्मिष्ठा राऊत
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधीपासूनच खूप लोकप्रिय होती. ‘बिग बॉस’नंतर तिने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. सध्या ती ‘जिजामाता’ या मालिकेत काम करत आहे.

नेहा शितोळे
‘सॅक्रेड गेम्स’मधील अभिनेत्री नेहा शितोळे ही ‘धाकड गर्ल’ या नावाने देखील ओळखली जाते. ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर ती खूप चर्चेत होती. ती सर्वांची आवडती स्पर्धक होती. तसेच ती मराठी ‘बिग बॉस २’ मध्ये रनरअप विजेती होती.

शिव ठाकरे
रियॅलिटी शो ‘रोडिज’मधून प्रसिद्ध झालेला शिव ठाकरे याने ‘बिग बॉस’मध्ये धमाल केली होती. त्याच्या दिलखुलास स्वभावाने त्याने सगळ्यांना आपलेसे केले होते. मराठी ‘बिग बॉस’ २ मधील तो विजेता स्पर्धक होता.

नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी ३’चं मराठमोळं घर पाहिलं का? पसरलंय तब्बल १४००० चौरस फूटांमध्ये

-अभिनेत्री दिव्या दत्ताला ‘अशा’ दिग्दर्शकांसोबत काम करणे नाही पसंत; म्हणाली, ‘मी नर्व्हस होते…’

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

-केवळ ३० रुपयांसाठी शबाना करायच्या ‘हे’ काम; घरच्यांच्या विरोधात जाऊन केलं विवाहित पुरुषाशी लग्न

हे देखील वाचा