बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने ‘मिस इंडिया’ हा पुरस्कार जिंकून संपूर्ण भारतात तिचे नाव कमावले. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुष्मितासाठी हा पुरस्कार जिंकणे काही सोपी गोष्ट नव्हती. इथपर्यंत पोहचण्यासाठी तिने खूप मेहनत केली. यानंतर संपूर्ण देशात तिला ओळख मिळाली.
सुष्मिताचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 साली हैद्राबादमध्ये एका बंगाली कुटुंबात झाला. जगातील अनेक सौंदर्यवतींना हरवून तिने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा पुरस्कार तिच्या नावी केला. परंतु यावेळी ती या स्पर्धेतून तिचे नाव मागे घेत होती. या गोष्टीचा खुलासा तिने स्वतः केला होता. तिने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिला समजले की, या स्पर्धेत ऐश्वर्या राय भाग घेणार आहे हे ऐकून तिने तिचे नाव मागे घेण्याचा विचार केला होता. ( let’s know about Sushmita Sen)
एका शोमध्ये सुष्मिता सेनने सांगितले होते की, “जेव्हा 1994 मध्ये जेव्हा मी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा मला अजिबात माहीत नव्हते की, ऐश्वर्या राय यात भाग घेणार आहे. जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा 25 मुलींनी या स्पर्धेतून त्यांचे नाव मागे घेतले.”
तिने पुढे सांगितले की, “सौंदर्याबाबत ऐश्वर्या रायचा सामना कोणीही करू शकत नाही. ती या स्पर्धेत भाग घेणार आहे हे समजल्यानंतर अनेक मुली घाबरल्या होत्या. स्पर्धेत भाग घेण्याआधीच अनेकांनी हार मानली आणि नाव मागे घेण्याचा विचार केला. हे सगळं पाहून माझा आत्मविश्वास कमी व्हायला लागला आणि मी देखील माझे नाव मागे घेण्याचा विचार केला.”
सुष्मिताने पुढे सांगितले की, “25 मुलींनी त्यांचे नाव मागे घेतले होते आणि मी देखील हाच विचार करत होते. या दरम्यान मी स्वतः ला प्रश्न विचारत होते. ऐश्वर्या रायचे नाव ऐकून मी म्हणाले माझा फॉर्म परत द्या मला यात भाग घ्यायचा नाही. मला असे वाटले की, ती एवढी सुंदर आहे की, संपूर्ण दुनिया तिला ओळखते त्यामुळे आपण यातून बाहेर पडलेले बरे.”
परंतु नंतर तिने हिंमतीने या स्पर्धेत तिचे नाव ठेवले आणि तिच्या ध्यानीमनी नसताना तिने ही स्पर्धा जिंकली देखील.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
रोमँटिक अंदाजात दिसणार कार्तिक अन् कियारा, ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज
बेधुंद पावसात भिजायला लावणारी प्रेमाची ‘अंब्रेला’; ‘या’ दिवशी चित्रपटागृहात हाेणार प्रदर्शित