Saturday, June 29, 2024

बॉलिवूडमधील ‘हा’ दिग्गज आहे अनन्या पांडेचा गुरू, म्हणाली ‘माझा प्रत्येक चित्रपट…’

बॉलिवूडमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींमध्ये अनन्या पांडेचे (Ananya Pandey) नाव सर्वप्रथम घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने तिने सिनेसृष्टीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या अनन्या तिच्या लायगर चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये ती दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंंडासोबत अभिनय करताना दिसत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करु शकला नसला तरी अनन्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक होताना दिसत आहेत. अशातच अनन्या पांडेने तिच्या सिनेसृष्टीतील गुरूविषयी भाष्य केले आहे. 

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या लायगर चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्याचबरोबर अनन्या सध्या विजय देवरकोंडासोबतच्या अफेयरमुळेही चर्चेत आहे. अनन्याने अलिकडेच एका मुलाखतीत तिच्या चित्रपटसृष्टीतील यशाबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे.  बॉलीवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत अनन्या पांडेने खुलासा केला की चित्रपट निर्माता करण जोहर तिचा गुरू आहे ज्याच्या सल्ल्याने ती चित्रपट निवडते. नुकतीच अनन्या पांडे करण जोहरच्या प्रोडक्शनखाली बनलेल्या ‘लायगर’ चित्रपटात दिसली होती. इतकेच नव्हेतर अनन्याने करणच्या चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले.

अनन्या पांडेने निवडक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तिच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत करते, पण दुर्दैवाने तिचे मोजकेच चित्रपट हिट झाले आहेत. ‘लायगर पुर्वी ती गेहराईयां या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये दीपिका पदुकोणशिवाय सिद्धांत चतुर्वेदीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. दरम्यान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना दिसणार आहे. याशिवाय ‘खो गये हम कहाँ’ हा देखील अनन्याचा आगामी चित्रपट आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –
जया बच्चन यांनी नात नव्याला दिला रिलेशनशिपचा सल्ला, म्हणाली,”लग्न न करता तू आई झाली तरी…”
पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात पाहा अदाची अदा

हे देखील वाचा