Thursday, July 18, 2024

जया बच्चन यांनी नात नव्याला दिला रिलेशनशिपचा सल्ला, म्हणाली,”लग्न न करता तू आई झाली तरी…”

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री जया बच्चन(Jaya Bachchan) तिची नात नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda) हिच्या खूप जवळ आहे. जया बच्चन त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. जया यांनी श्वेता बच्चन नंदासोबत ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती. या एपिसोडमध्ये जयाजींनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडत त्यामागील स्पष्टीकरण सुद्धा दिले.

नेहमीप्रमाणेच जया बच्चन यांनी असे काही भाष्य केले आहे की, ज्यावर आता जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे. यावेळी त्यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यावर भाष्य केले. जया बच्चन म्हणाल्या की, कोणतेही नाते चालवण्यासाठी शारीरिक आकर्षण आवश्यक असते. आमच्या काळातमध्ये आम्ही काही गोष्टी करून पाहू शकत नव्हतो. फक्त प्रेम आणि समजूतदारपणा दाखवून नातं टिकणं अवघड असते. लोकांना माझे हे बोलणे कदाचित पटणार नाही.

 

View this post on Instagram

 

त्या नव्याला म्हणाल्या, “मी याकडे वैद्यकीयदृष्ट्या पाहते. सध्या सर्वत्र भावनाशून्य लोक पाहायला मिळतात. माझ्या मते, तु तुझ्या बेस्ट फ्रेन्डशी लग्न करायला हवंस. ती व्यक्ती तुला फार प्रिय आहे. परिणामी त्या व्यक्तीला तू ‘मला तू आवडतोस म्हणून मला तुझ्या बाळाला जन्म द्यायला आवडेल’ असं म्हणू शकतेस . पण याउलट आपल्याकडे मला तू आवडतोस म्हणून लग्न करुया असे शिकवले जाते. ”

पुढे म्हणाल्या की आम्ही ज्या काळात मोठे झालो, त्यावेळी हे सर्व आम्ही नाही करू शकलो. आमच्यानंतर श्वेताच्या पिढीतल्यांनाही नात्यामध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाली नाही. पण आताची पिढी हे सर्व करु शकते आणि त्यांनी हे काय करू नये? मला असे वाटते की, शारीरिक संबंधाशिवाय नाते फार काळ टिकू शकत नाही. म्हणून फिजिकल अट्रक्शन खूप महत्वाचे आहे. यामुळे जर उद्या नव्याने लग्नाच्या अगोदर बाळाला जन्म दिला तर मला काहीच प्राॅब्लेम नसणार, जया बच्चन यांच्या या विधानाने अनेकांनी आर्श्चय व्यक्त केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात पाहा अदाची अदा

‘कांतारा’च्या यशानंतर अभिनेता पोहोचला रजनीकांतच्या घरी, रिषभ शेट्टी व थलायवा भेटीचा फोटो व्हायरल

हे देखील वाचा