Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड ‘तू ग्रहावरील सगळ्यात हॉट आई’, तीन मुलांची आई असलेल्या लिसा हेडनचा सोशल मीडियावर बिकिनीत राडा

‘तू ग्रहावरील सगळ्यात हॉट आई’, तीन मुलांची आई असलेल्या लिसा हेडनचा सोशल मीडियावर बिकिनीत राडा

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (lisa haydon) ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. अशातच तिने समुद्रात एन्जॉय करतानाचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तीन मुलांची आई लिसा काळ्या रंगाची बिकिनी परिधान करून समुद्रात सर्फिंगचा आनंद लुटताना दिसत आहे. तिची टोन्ड फिगर पाहून लोकांच्या मनाचा थरकाप उडाला. अभिनेत्री पूजा हेगडेने तर म्हटले आहे की, ती या ग्रहावरील सर्वात हॉट आई आहे.

मॉडेल आणि अभिनेत्री लिसा बालीमध्ये सर्फिंगचा आनंद घेत होती, ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले. तिने तिच्या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, “बालीमध्ये सर्फिंग करताना तिला नेहमीच भीती वाटत होती, कारण तेथे लाटा खूप उंच होतात.”

https://www.instagram.com/p/CfvTDepvplr/?utm_source=ig_web_copy_link

लिसाची ही पोस्ट पाहून तिच्या टोन्ड बॉडीने चाहते भडकले आहेत. पूजा हेगडेने पोस्टवर कंमेंट केली, “म्हणजे… अशी बॉडीही असू शकते! तू नक्कीच या ग्रहावरील सर्वात हॉट आई आहेस.”

लिसाचा जन्म चेन्नईत झाला. त्याचे वडील मल्याळी आणि आई ऑस्ट्रेलियन आहे. २००७ मध्ये ती भारतात शिफ्ट झाली. तिने २०१६ मध्ये दिनो लालवाणीशी लग्न केले. दोघांना तीन मुले आहेत. लिसाने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले असून शिमक दावर यांच्याकडून पाच वर्षे प्रशिक्षण घेतले आहे.

लिसा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे. २०१० मध्ये आयशासोबत तिने अभिनयाच्या जगात प्रवेश केला. यानंतर ती ‘हाऊसफुल ३’ आणि ‘ए दिल है मुश्किल’मध्ये दिसली. लिसा तिच्या शैलीसाठी देखील ओळखली जाते. ट्रोल्सना ती चोख प्रत्युत्तर देते. फ्लॉंटिंग बेबी बंपपासून ते ब्रेस्ट फीडिंगपर्यंत, ती फोटो शेअर करायला कधीच कचरत नाही.

लिसाला वयाच्या १८ व्या वर्षी योगा टीचर बनायचे होते. त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. मात्र, मित्रांच्या सांगण्यावरून क्लासची फी आणि भाडे भरण्यासाठी तिने मॉडेलिंग सुरू केले.

हेही वाचा-

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी गुरुदत्त होते टेलिफोन ऑपरेटर ,वाचा त्यांच्याबाबत कधीही न ऐकलेल्या गोष्टी

गर्लफ्रेंड सबा आझादसोबत पॅरिसमध्ये सुट्यांची मजा लुटतोय ऋतिक रोशन, पोस्ट होतेय व्हायरल

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा