अभिनेत्री लिसा हेडन झाली तिसऱ्यांदा आई, हटके अंदाजात दिली गुड न्यूज


कोरोनाकाळ असूनही मनोरंजनसृष्टीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक कलाकार लगीनगाठ बंधनात आहेत, तर काही कलाकार आई- वडील होत आहे. अशीच एक अभिनेत्री नुकतीच आई झाली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री असलेली लिसा हेडन नुकतीच तिसऱ्यांदा आई झाली. लिसाने एका मुलीला जन्म दिला आहे. लिसा आणि तिचा पती हेडनने तिसऱ्यांदा आई- वडील झाले आहेत. मात्र, लिसाने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली नाही.

तिच्या एका फॅन तिला सोशल मीडियावर एक प्रश्न विचारला आणि लिसाने ही माहिती दिली आहे. लिसाच्या फॅनने तिला विचारले की, “तू मला सांगू शकते का, तुझे तीन छोटे- छोटे बाळं कुठे आहेत?” यावर लिसाने उत्तर दिले की, “माझ्या कुशीत.”

Photo Courtesy: Instagram/lisahaydon

लिसाचे हे उत्तर ऐकून फॅन्सने तिला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. लिसा आणि हेडनला याआधी दोन मुलं आहेत. लिसा तिसऱ्यांदा जेव्हा आई होणार होती, तेव्हा तिने अनेकदा बोलून दाखवले होते की, तिला तिसऱ्यांदा मुलगीच पाहिजे.

दरम्यान लिसा हेडनने तिच्या तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात ती सांगत होती की, “माझ्या आळशीपणामुळे मी फॅन्सला माझ्या प्रेग्नेंसीची माहिती लवकर देऊ शकली नाही. या व्हिडिओत ती तिच्या मुलाला जॅकला विचारते आईच्या पोटात काय आहे, त्यावर जॅक बोलतो बेबी सिस्टर.”

जेव्हा लिसाने तिचे बेबी बंप फ्लॉन्ट केले, तेव्हा तिला अनेकांनी खूप ट्रोल केले होते. लिसा तिसऱ्यांदा आई होणार असल्याने तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले गेले होते. लिसाने देखील ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले होते.

लिसाने २०१६ साली तिचा बॉयफ्रेंड असलेल्या डिनो लालवानीसोबत फुकेटमध्ये लग्न केले. डिनो हा मूळचा पाकिस्तानी असून तो एक ब्रिटिश उद्योजक आहे. लिसाने सोनम कपूर आणि अभय देओलच्या ‘आयेशा’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. सोबतच ती ‘हाउसफुल ३’, ‘द शौकीन्स’, रास्कल्स, ‘क्वीन’, ‘ऐ दिल है मुश्किल’ आदी चित्रपटांमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.