Monday, July 8, 2024

Lock Upp | पूनम पांडेने सांगितला तिच्या लग्नाचा थरारक अनुभव, ‘या’ कामासाठी पती करायचा छळ

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) होस्ट करत असलेला आणि एकता कपूर (Ekta Kapoor) निर्मित ‘लॉक अप: बॅडास जेल अत्याचारी खेल’ या रियॅलिटी शोमध्ये दुसऱ्या दिवसापासून वाद सुरू झाला आहे. मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Pandey) माजी पती सॅम बॉम्बेसोबतच्या तिच्या वेदनादायक नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

‘या’ कामासाठी पती करायचा जबरदस्ती
तिचे सहकारी स्पर्धक करणवीर बोहरा (Karanveer Bohra) आणि पायल रोहतगी (Payal Rohtagi) यांच्याशी बोलत असताना, पूनमने शेअर केले की, तिला सॅम आवडत नाही. परंतु ती खरोखर त्याचा द्वेष करत नाही. ती पुढे म्हणाली की, जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे मोठे घर चार मजली होते. परंतु सॅमने तिला दुसर्‍या खोलीत राहू दिले नाही आणि तिला एकाच खोलीत एकत्र राहण्यास भाग पाडले.

फोनला स्पर्श करण्याची नव्हती परवानगी
पूनमने असेही सांगितले की, तिला घरात तिच्या फोनला हात लावण्याचीही परवानगी नव्हती. तिने उघड केले की, सॅम तिच्या डोक्यावर सतत एकाच ठिकाणी मारत असे, ज्यामुळे ‘ब्रेन हॅमरेज’ होऊ शकते. तिने सांगितले की, तो सकाळी १० वाजल्यापासून दारू पिण्यास सुरुवात करायचा आणि मध्यरात्रीपर्यंत चालूच असे.

एका वर्षात तुटले लग्न
पूनमने तिचा दीर्घकालीन बॉयफ्रेंड आणि निर्माता सॅम बॉम्बेसोबत सप्टेंबर २०२० मध्ये लग्न केले. याआधीही तिने त्याच्यावर अनेकदा घरगुती अत्याचार आणि विनयभंगाचे आरोप केले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये पूनमला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सॅमला अटकही केली होती.

‘हे’ कलाकार आहेत ‘लॉकअप’मध्ये कैद
‘लॉक अप’ बद्दल बोलताना स्पर्धकांना दोन टीममध्ये विभागले गेले आहे. जे त्यांच्या ड्रेसच्या रंगावरून ओळखले जातील. ऑरेंज टीम राईट ब्लॉक आणि ब्लू टीम लेफ्ट ब्लॉक आहे. करणवीर, पायल, सिद्धार्थ शर्मा, बबिता फोगट, अंजली अरोरा, पूनम आणि मुनव्वर फारुकी हे ऑरेंज टीमचे सदस्य आहेत. तर तेहसीन पूनावाला, निशा रावल, शिवम शर्मा, स्वामी चक्रपाणी महाराज, सारा खान आणि सायशा शिंदे हे ब्लू टीमचे सदस्य आहेत.

त्यांच्याविरुद्ध चार्टशीट केले जारी
‘बिग बॉस’ प्रमाणे स्पर्धकांना पहिल्या दिवशी दोन लोकांना नॉमिनेट करण्यास सांगितले होते. ज्यांना त्यांना त्यांच्या घरी परत पाठवायचे आहे. नामांकन प्रक्रियेनंतर मुनव्वर, अंजली, स्वामी चक्रपाणी, सिद्धार्थ आणि शिवम या पाच स्पर्धकांविरुद्ध ‘चार्जशीट’ जारी करण्यात आले.

लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या
अलिकडेच पूनमने खुलासा केला होता की, “जेव्हा मी घरगुती हिंसाचाराचा सामना करत होते तेव्हा मी ट्विटरवर ट्रेंड करत होते. मी एका न्यूज चॅनलवर पाहिलं, जिथे दोन प्रकारचे लोक वाद घालत होते. एका बाजूचे लोक म्हणाले की, ती असे कपडे घालते, ती असे वागते, तिच्यासोबत हे असच व्हायला पाहिजे होत. तर दुसऱ्या बाजूचे लोक म्हणाले, ते काहीही असो पण तिच्यासोबत असे का झाले. हे कोणाच्याही बाबतीत घडू नये, मला कळत नाही की लोक त्या व्यक्तीचा मुद्दा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीत.”

वाद निर्माण केल्याचे केले मान्य
त्याचवेळी पूनमने पुढे कबूल केले की, काम मिळत नसताना तिने वाद निर्माण केला. ती म्हणते की, ती त्यावेळी लहान होती. त्यामुळे तिला करिअर करण्यासाठी कोणीही काहीही सांगितले, ते तिने डोळे बंद करून केले. नंतर तिला समजले की, ती चुकीची आहे. आता तिला फक्त काम करायचे आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा