×

कंगना रानौतने पूनम पांडेला विचारले, तू अडल्ट सिनेमे बनवत त्यांना करते प्रमोट?, त्यावर ती म्हणाली…

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिचा ‘लॉकअप’ हा शो सुरु झाला असून, या शोच्या निमित्ताने कंगना चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. तिच्या शो संबधित काही फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अभिनेत्री कंगना म्हणटल्यानंतर वाद तर होणारच. कंगनाच्या या नवीन शोमध्ये बोल्ड, बिनधास्त आणि वादग्रस्त अभिनेत्री पुनम पांडे ही दिसणार आहे. या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कंगना पुनमला अडल्ट व्हिडिओवर एक प्रश्न विचारत आहे. ज्याच तिला उत्तरही मिळते.

कंगणाचा लॉकअप शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हारयल होताना दिसत आहे. त्या प्रोमोमध्ये कंगना पुनमला विचारते की, तु प्रौढ चित्रपट बनवते आणि प्रमोट करतेस यावर तुला विश्वास आहे का? या प्रश्नावर पुनम तिला उत्तर देताना दिसत आहे. ती म्हणते की, “आजपर्यंत मी जितकेही फोटो आणि व्हिडिओ बनवले आहेत त्यावेळेस मी कोणताही कायदा मोडलेला नाही. जर लोकांना खोटे इतकेच आवडत असेल तर तर त्यांना खरे देखील नक्कीच आवडेल याबाबत मला नक्कीच विश्वास आहे.” पुनमचे खूप बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हारयल होताना दिसतात.

कंगनाचा ‘लॉकअप’ हा शो ७२ दिवस चालणार आहे. यामध्ये एकून १६ सेलिब्रिटीज सहभाग घेणार असून त्यांना यात मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत. हा शो ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना या दोन्ही माध्यमावरती विनामुल्य शो पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये अभिनेत्री निशा रावल, पूनम पांडे, स्टॅडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी, कुस्तीपटू बबीता फोगाट, पायल रोहतगी, सारा खान, तहसीन पूनावाला, सायशा शिंदे आणि अभिनेता करणवीर बोहरा हे कलाकार शोमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा  –

Latest Post