एकता कपूरने ‘लॉक अप’ शोची घोषणा केली आणि हा शो चर्चेत आला. कंगना रणौत देखील या शोमुळे खूपच चर्चेत आली असून, या शोमुळे तिच्या प्रसिद्धीमध्ये अधिकच भर पडताना दिसत आहे. या शोच्या अनेक क्लिप प्रोमो सोशल मीडियावर देखील सतत व्हायरल होत आहे. कंगनाकडून स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या टास्कमुळे देखील शो गाजताना दिसत आहे. बॉटम तींमधून एका कैदी या अत्याचारी खेळातून बाहेत पडला. मात्र त्याआधी स्पर्धकांना कंगनाने दिलेल्या एका आव्हानाचा सामना करावा लागला. ज्या दोन कैद्यांनी या आव्हानाला पेलून पार केले ते वाचले आणि उरलेल्या एका कैदीला या मोकळे करण्यात आले आहे.
‘लॉक अप’ शोच्या बॉटम टीममधील स्पर्धकांना खेळात बनून राहण्यासाठी कंगनाने एका आव्हान दिले होते. तिने त्यांना सांगितले की, बॉटम टीममधील स्पर्धक त्यांचे असे गुपित सर्वांना सांगतील जे कोणालाही माहित नसेल. यानंतर सिद्धार्थ शर्मा आपले गुपित सर्वांना सांगताना जोरजोरात रडू लागला. तर अंजली तिचे गुपित सांगताना तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया कशी असेल या विचाराने घाबरलेली दिसली. शोमध्ये पुढे जाण्यासाठी या दोघांना मोठे आव्हान पार करावे लागले.
ज्या तीन स्पर्धकांना कंगनाची हा अत्याचारी खेळ खेळावा लागला त्या तिघांमध्ये स्वामी चक्रपाणी महाराज, सोशल मीडिया इंफ्लुएंसर अंजली अरोड़ा आणि सिद्धार्श शर्मा यांचा समावेश होता. या तिघांना खेळात टिकून राहण्यासाठी बजर वाजवून त्यांचे गुपित सांगायचे होते. मात्र स्वामी चक्रपाणी यांना त्यांचे गुपित सांगणे योग्य न वाटल्याने त्यांना हा शो सोडावा लागला. मुख्य म्हणजे स्वामी चक्रपाणी यांनी स्वतः सांगितले की त्यांना या शोमधून बाहेर पडायचे असल्याने तुम्ही सिद्धार्थ शर्माला वाचवा. यानंतर स्वामी चक्रपाणी यांना कैदेतून मुक्त करण्यात आले.
तत्पूर्वी ‘लॉक अप’ या शोमध्ये १३ स्पर्धक कैद असून ज्यांमध्ये स्वामी चक्रपाणी, मुनव्वर फारूकी, अंजली अरोड़ा, करणवीर वोहरा, पूनम पांडे, बबीता फोगाट, निशा रावल, सिद्धार्थ शर्मा, तहसीन पूनावाला, पायल रोहतगी, सारा खान, शिवम शर्मा, साइशा शिंदे हे सामील आहे. मात्र आता या शोमधून स्वामी चक्रपाणी बाहेर पडले.
हेही वाचा –