Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया, अभिनेत्रीने सांगितले ‘हे’ मुख्य मुद्दे

लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया, अभिनेत्रीने सांगितले ‘हे’ मुख्य मुद्दे

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार 19 एप्रिलपासून निवडणुकांना सुरुवात होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, देशभरात लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत अनेक सिनेस्टार आपले नशीब आजमावताना दिसणार आहेत. यातील एक नाव हेमा मालिनी. (Hema Malini)अभिनयाच्या दुनियेत नाव कमावल्यानंतर हेमा मालिनी राजकारणात पूर्णपणे सक्रिय आहेत. त्या सध्या मथुरेतून खासदार आहेत. भाजपने त्यांना पुन्हा एकदा त्याच जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया आली आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांच्या निवडणुकीतील मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मुख्य मुद्दा विकासाचा असल्याचे त्या म्हणाल्या. आपण खूप काही केले आहे आणि येणाऱ्या काळात जनतेसाठी अजून बरीच कामे करायची आहेत. आपल्या कामगिरीचे वर्णन करताना भाजप खासदार म्हणाल्या की, “आम्ही 84 कोस परिक्रमा सुरू केली होती आणि आता ती पूर्ण करायची आहे. आगामी काळात शहराचे सुशोभीकरण, वाहतूककोंडीची समस्या, शिक्षण यावरही काम केले जाणार असल्याचे हेमा यांनी सांगितले. या संवादात हेमाने सांगितले की, तिची प्राथमिकता यमुना नदीला असेल. यमुनेच्या स्वच्छतेसाठी त्यांनी ब्रजवासीयांना ही समस्या समजून घेऊन साथ देण्याचे आवाहन केले.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

गायिका अनुराधा पौडवाल यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश, सोशल मीडियावर जाहीर केला आनंद
‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण थरारपटाची पहिली झलक प्रेक्षक भेटीला

हे देखील वाचा