Monday, July 1, 2024

Rhea Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला CBI कडून ‘लूक आऊट’ नोटीस; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला (Sushant Singh Rajput) मृत्यूव होऊन अनेक वर्ष उलटून गेली आहे. पण आजही त्याचे चाहते त्याची आठवण काढत असतात. सुशांत सिंग राजपूत मृत्यूव प्रकरणावेळी प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्ती ( Rhea Chakraborty) चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचो लाखो चाहते आहेत. पण सध्या रिया चक्रवर्तीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) विरोधात सीबीआयकडून ‘लूक आऊट’ नोटीस काढण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयची चौकशी सुरू असताना ही नोटीस काढण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंग राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणात रियासह तिच्या कुटुंबातील सदस्यांच्याही चौकशी केली आहे. चौकशीत रियाच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर सीबीआयने ही नोटीस काढली असल्याचे सांगितले जात आहे.

रिया चक्रवर्तीने या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. रियाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तिला विदेशात जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तिला या नोटीसमधून सूट देण्यात यावी. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर अनेक आरोप झाले होते. रियाला 2021 मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाने जामीन दिला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात सीबीआयची चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या चौकशीत रियाच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर सीबीआयने ही नोटीस काढली असल्याचे सांगितले जात आहे. सीबीआयच्या या आरोपांमुळे रिया चक्रवर्तीवर मोठा संकट आले आहे. या प्रकरणामुळे रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यांना या बातमीमुळे मोठा धक्का बसला आहे. (Look out notice from CBI to actress Rhea Chakraborty)

आधिक वाचा-
‘बोल्ड आणि बिनधास्त’ क्रितीचं ग्लॅमरस फोटोशूट, अतरंगी पोझेसने चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
‘अ‍ॅनिमल’मधील ‘जमाल जमालो कुडू’ गाण्याची नारकर जोडप्याला भूरळ; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

हे देखील वाचा