Sunday, April 14, 2024

सुशांतच्या पुण्यतिथीला रिया चक्रवर्ती झाली भावुक, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक विषेश जागा निर्माण केली होती. सुशांत जरी आज आपल्यात नसला, तरीही तो चाहत्यांच्या मनात अजूनही जिवंत आहे. परंतु सुशांतचा अप्रतिम प्रवास चाहत्यांना नेहमीच प्रेरणा देणारा आहे. मुंबईत आल्यानंतर सुशांतने खूप संघर्ष केला होता. त्यावेळी त्याला मालिकेत मुख्य भूमिका मिळाली होती. 2009 ते 2011 पर्यंत सुशांतने खूप मेहनत केली. त्यानंतर त्याने चित्रपटात आपले पहिले पाऊल ठेवले.

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता अशी सुशांत सिंग राजपूतची (Sushant Singh Rajput) ओळख बनली. जी आजही लोकांच्या समरणात कायम आहे. आजही त्याला आणि त्याच्या चित्रपटांना आठवले जाते. तीन वर्ष झाले त्याचे निधन होऊन तरीही अजून त्याचे फॅन्स त्याला विसरलेले नाही. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्युव झाला होता. त्यावेळी सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत होता.

सुशांतच्या पुण्यतिथीच्या दिवशी, रियाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांत सोबतचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिया आणि सुशांत एकमेकांसोबत प्रेमळ क्षण घालवताना दिसत आहेत. रिया आणि सुशांत एका मोठ्या खडकावर बसले आहेत. रियाने सुशांतला अलगत प्रेमाने मिठी मारली आहे. दोघेही एकमेकांसोबत एन्जॉय करत आहेत.

दरम्यान सुशांतने 14जानेवारी 2020 मध्ये त्याच्या फ्लॅटवर आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांची कसून चौकशी चालू होती. त्यावेळी रिया चक्रवर्तीला देखील अनेकवेळा पोलीस स्टेशनला हजर रहावे लागले होते. परंतु त्यांनी आत्महत्या केल्याचे नक्की कारण काय होते हे अद्यापही समोर आले नाही. सुशांत आणि रियाची पहिली भेट 2013मध्ये झाली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये राहिले.

रिया चक्रवर्ती विषयी बोलायच झाले तर, रियाने अलीकडेच एम.टीव्ही रोडीज सीझन 19 द्वारे पुनरागमन केले आहे. रिया या शोमधील गँग लीडरपैकी एक आहे. रिया व्यतिरिक्त नवीन सीझनमध्ये आणखी तीन जज आहेत. ते प्रिन्स नरुला, गौतम गुलाटी आणि सोनू सूद हे आहेत. (Actress Rhea Chakraborty’s memories of Sushant Singh Rajput are emotional)

अधिक वाचा-
मराठी चित्रपट न करण्याबाबत अशोक सराफ यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले, “…म्हणुन मी नकार कळवतो”
‘आय लव यू’ म्हणत मितालीने सिद्धार्थ चांदेकरचा ‘तो’ फोटो केला शेअर; पहा फोटो 

हे देखील वाचा