Thursday, June 13, 2024

‘लस्ट स्टोरीज सीझन 2’चा नवीन प्रोमो रिलीज, विजय वर्मा अन् तमन्ना दिसले प्रेमावर वाद घालताना

बाॅलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा सध्या खूप चर्चेत आहेत. दोघांच्या डेटिंग रूमर्स बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत, परंतु त्यांनी यापूर्वी कधीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले नव्हते. अशात आता तमन्नाने स्वतः या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दोघांची जोडी लवकरच ‘द लस्ट स्टोरीज 2’ मध्ये दिसणार आहे.

त्यांच्या नात्याची पुष्टी केल्यानंतर, तमन्ना (tamannaah bhatia) आणि विजय (vijay varma) ‘लस्ट स्टोरीज 2’च्या नवीन प्रोमोमध्ये एकत्र दिसत आहेत, जिथे दोघे ‘लव्ह स्टोरीज’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ मधील फरकावर चर्चा करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बाेलायचे झाले, तर तमन्ना आणि विजय बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात दोघांनीही आपल्या नात्याबद्दल माैन साेडले असून गेल्या आठवड्यातच दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल सर्वांसमाेर सांगितले आहे. अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तमन्ना म्हणाली की, “विजय एक असा व्यक्ती आहे, ज्याची मी काळजी घेते आणि तो माझ्या आनंदाची जागा आहे.”

एका मुलाखतीत विजयबद्दल बोलताना तमन्ना म्हणाली, “मला वाटत नाही की, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. कारण, ते तुमचे सह-कलाकार आहेत. मला वाटते की, एखाद्याच्या प्रेमात पडायचे असेल, तर एखाद्याला एखाद्यासाठी काहीतरी वाटले पाहिजे म्हणून ते निश्चितपणे अधिक वैयक्तिक आहे आणि ते जगण्यासाठी काय करतात याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

तमन्ना भाटीयाच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री आणि विजय वर्मा लवकरच ‘द लस्ट स्टोरीज 2’ मध्ये दिसणार आहेत. ही सीरीज लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफिल्कसवर प्रदर्शित हाेईल.(lust stories 2 new promo bollywood actress tamannaah bhatia and vijay varma argue if every love story is a lust )

अधिक वाचा-
‘मैं निकला गड्डी लेके’वर सनी देओलने लावले ठुमके, व्हिडिओ नाही पाहिला तर मग काय पाहिलं?

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलला होणार अटक?, रांची कोर्टाने वॉरंट केले जारी

हे देखील वाचा