Friday, December 1, 2023

तमन्ना भाटियाचा बोल्ड सीन पाहून युजर संतापले; म्हणाले, “तुला लाज नाही वाटली?”

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया होय. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असेत. तिच्या फोटोला आणि व्हिडिओला चाहते भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. तमन्नाने तिच्या खासगी आयुष्यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

साऊथच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) नेहमीच चर्चेत असते. तिच्या सौंदर्याची तिच्या चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ आहे. अभिनेत्री तमन्ना सध्या चर्चेत आली आहे. एकीकडे तमन्नाची वेब सिरीज ‘जी कारदा’ 15 जूनला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तमन्ना विजय वर्मासोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मात्र, तमन्ना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ‘जी कारदा’ ही एक रोमँटिक ड्रामा मालिका आहे. ज्यामध्ये तमन्नाने बोल्ड इंटिमेट सीन शूट केले आहेत. जो पाहून चाहते संतापले आहेत.

कमेंट करताना एका युजरने लिहीले की, “फिल्मी करिअरला 18 वर्ष पुर्ण झाल. आता अखेर बॉलीवूडमध्ये तमन्नावरसुद्धा बोल्ड सीन करण्याची वेळ आलीच…” दुसऱ्याने लिहीले की, “तमन्ना भाटिया करिअरच्या दुसरी इनिंगमध्ये आहे. ‘जी करदा’ आणि ‘लस्ट स्टोरीज’मधल्या अशा ढंगातील भूमिका स्वीकारण्याआधी तू थोडा तरी विचार करायला पाहिजे होतास.”

दरम्यान, अरुणिमा शर्मा दिग्दर्शित ‘जी कारदा’ मालिकेचे एकूण 8 भाग आहेत. ही एक रोमँटिक ड्रामा वेब सीरिज आहे, ज्यामध्ये तमन्ना भाटिया, सुहेल नय्यर, आशिम गुलाटी आणि अन्या सिंह मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम करण्यात आली आहे. (Actress Tamannaah Bhatia was trolled by a user)

अधिक वाचा- 
‘चौक’चा जबरा फॅन! बारामतीच्या एका पठ्ठ्याने संपुर्ण थिएटर बुक करून एकट्यात बघितला चित्रपट; म्हणाला…
विनोदवीर कपिल शर्माने सुरू केला ब्लाॅग; म्हणाला, ‘खर्च भागत नाही म्हणून…’ 

हे देखील वाचा