Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘कुंडी लगालो सैंय्या’ गाण्यातील माधुरी पवारच्या बोल्ड अदांवर प्रेक्षक झाले फिदा, व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रानबाजार वेबसिरीज सध्या चांगलीच चर्चेत आहे. प्रदर्शनाआधीच या सिरीजच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर प्राजक्ता माळी (Prajkta Mali) आणि तेजस्विनी पंडितच्या (Tejaswini Pandit)  बोल्ड लूकने आणि सीनमुळे ही सिरीज प्रचंड चर्चेत आली. प्राजक्ता आणि तेजस्विनीच्या बोल्डलूकची चर्चा सुरू असतानाच आता माधुरी पवारच्या (Madhuri Pawar) कुंडी लगालो सैंय्या या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. माधुरी पवारचा तुफान तडफदार डान्स यामध्ये पाहायला मिळत आहे.

माधुरी पवार सध्या तिच्या रानबाजार सिरीजमधील दमदार भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सिरीजमधील माधुरीच्या डॅशिंग, करारी भूमिकेने सर्वांनाच वेड लावले आहे तर प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितच्या बोल्ड अभिनयाचीही सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. जबरदस्त पॉलिटिकल थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्यातच आता प्रेक्षकांच्या भेटीला माधुरी पवारचे धमाकेदार गाणे आले आहे. ज्यामध्ये तिचा जबरदस्त डान्सचा तडका पाहायला मिळत आहे.

कुंडी लगालो सैंय्या या गाण्यामध्ये माधुरी पवारचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. गाण्यामध्ये आपल्या दिलखेचक अदा आणि घायाळ करणाऱ्या इशाऱ्यांवर प्रेक्षक चांगलेच भाळले आहेत. त्यामुळेच हे गाणे सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. त्याचबरोबर गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. हे सध्या तुफान गाजत असलेले गाणं डॉ. पल्लवी श्यामसुंदर यांनी गायलं असून गाण्याचं शब्द ‘अभिजीत पानसे’यांनी लिहीलं आहेत. तर ‘प्रफुल्ल चंद्रा’ यांनी गाण्याचं मिक्सिंग केलं आहे. प्रेक्षकांना या गाण्याची चांगलीच भुरळ पडली आहे. या सिरीजच्या पहिल्या तीन एपिसोडला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- 

‘या’ अनिष्ठ प्रथेला नुसरत भरुचा देणार छेद, याआधीही अनेक अभिनेत्रींनी केला आहे धाडसी प्रयत्न

सैनिकांचा अपमान ते महाभारतातील द्रौपदीला लावला टॅटू, एकता कपूरतचे ‘हे’ कार्यक्रम सापडले होते वादाच्या भोवऱ्यात

‘मी शांत आहे मात्र आजारी नाही’, म्हणत धर्मेंद्र यांनी स्वतःच केला त्यांच्या तब्येतीबद्दल खुलासा

हे देखील वाचा