महाराष्ट्राची पहिली ‘अप्सरा’ माधुरी पवारचा ‘जुम्मा-चुम्मा’ या गाण्यावर जबराट डान्स, पाहा व्हिडीओ


छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. मालिका विश्वामध्ये राणा दा आणि अंजलीची जोडी जितकी चर्चेत राहिली, तितकिच नंदिता वहिनी यांची खलनायकेची भूमिका देखील तितकीच लक्षवेधी ठरली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपले हे पात्र मालिकेत अचूक साकारले होते.

मालिकेतील वाहिनी साहेबांच्या पात्राला आणि तिच्या हटके स्टाईलला अनेकांनी पसंती दर्शविली होती. परंतु धनश्रीने मालिका सोडण्याच्या निर्णयामुळे नंदिताचे पात्र कोण साकारणार होते ही चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि त्या जागेवर अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार ही वहिनी साहेबांची भूमिका साकारताना दिसली. ती एक उत्तम नृत्यांगना असून तिने ‘अप्सरा आली’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमात भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला होता.

माधुरी ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आपल्या नवनवीन व्हिडीओ ती चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असते. तिचे फोटो तर चाहत्यांना भुरळ घालतातच पण तिच्या व्हिडिओतून देखील ती आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करत असते. मालिकेत साडीवर दिसणाऱ्या माधुरीचा बोल्ड डान्स आणि फोटो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. आपल्या लावणी नृत्यातील अदाकारीने तीने चाहत्यांना अनेक वेळा घायाळ केले आहे. डान्सची विशेष आवड असलेल्या माधुरीने आपल्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट केल्या आहेत, ज्यातून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

माधुरीचे अनेक डान्स व्हिडीओ हे युवा पिढीचे अनेकदा आकर्षण ठरले आहे. नुकताच तिने अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा-चुम्मा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. सोबतच तिच्या मोहक अदादेखील आकर्षित करण्याऱ्या ठरल्या. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट करताच तिच्या त्या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया आल्या.

माधुरी पवारचा जन्म सातारा शहरात झाला आहे. तिने पुण्याच्या महाविद्यालयातून एमबीएची पदवी घेतली आहे. अगोदर पासूनच अभिनय व डान्सची आवड असलेला माधुरीला टिक टॉकमुळे अधिक लोकप्रियता मिळाली होती. तिचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात. आपल्या आई वडिलांचा प्रोत्साहनामुळे ती नृत्यात निपुण झाली. त्यामुळे तिच्या वडिलांनीच तिला नृत्याचे धडे दिले होते. त्यातूनच तिने अनेक नृत्य स्पर्धा गाजवल्या होत्या.

नृत्यासोबत तिने अभिनयाचे धडे देखील गिरवले होते. अजय गोगावले यांनी गायलेल्या ‘पावसाळी या ढगांनी’ या म्युजिक व्हिडिओमध्ये ती झळकली होती. अलीकडेच तिचा ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावरील एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.