बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रभावी अभिनेत्री कोण असा प्रश्न कोणालाही विचारला तर प्रत्येकाचे उत्तर एकच असेल आणि ते म्हणजे ‘मधुबाला’. बॉलीवूडला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणून मधुबाला ओळखल्या जातात. अस्मानी सौंदर्य लाभलेल्या मधुबाला यांच्याकडे उपजतच अभिनयाची कला होती. अतिशय मोठ्या आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून मधुबाला यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र एवढ्या यशस्वी असूनही त्यांच्या अंत खूपच त्रासदायक होता. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मधुबाला यांचे व्यावसायिक आयुष्य जेवढे गाजले तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील गाजले.
मधुबाला यांनी अभिनेते आणि गायक किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. मात्र मधुबाला आणि दिलीप कुमार यांची प्रेम कहाणी त्या काळात खूपच गाजली किंबहुना आजही तुफान गाजते. अतिशय आकंठ एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी लग्नाचा निर्णय तर घेतला मात्र मधेच माशी शिंकली आणि त्यांचे अनेक वर्षांचे नाते तुटले. त्यानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले. दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केले तर मधुबाला यांनी किशोर कुमार यांच्याशी.
मधुबाला यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले. या रोगाच्या निदानासाठी त्या लंडनला जात असताना काही दिवस आधी किशोर कुमार यांनी मधुबाला यांना लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि एकत्रच लंडनला गेले. लंडनमध्ये मधुबाला यांची तपासणी झाल्यानंतर डॉक्टरनी लगेचच सांगितले की, फार फार तर मधुबाला दोन वर्ष जगातील. त्यांचा आजार एवढा बळावला होता. मधुबाला यांच्या शेवटच्या काही दिवसांबद्दल त्यांची भिन्न असलेल्या मधुर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “किशोर कुमार त्यांच्या कामात खूपच व्यस्त होते. त्यांच्याकडे मधुबाला यांना भेटण्यासाठी देखील वेळ नव्हता. मधुबाला या त्यांच्या शेवटचं दिवसांमध्ये रडून त्यांचे दिवस काढायच्या.” तब्ब्ल नऊ वर्ष आजाराशी लढल्यानंतर 1969 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष
पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’