Tuesday, June 25, 2024

“जास्तीत जास्त वेळ घालवायचा…सोपं नव्हतं…”; ‘आई’ असलेल्या मधुराणी गोखलेची पोस्ट व्हायरल

आई कुठे काय करते? या मालिकेतून अमाप लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले. मराठीमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या मधुराणीला या मालिकेने एक नवीन ओळख दिली. मधुराणी मूळची पुण्याची, तिचे कुटुंब देखील पुण्यात असते. मात्र मालिकेची शूटिंग असते मुंबईमध्ये. त्यामुळे तिला सतत मुंबई-पुणे असा प्रवास करावा लागतो.

शूटिंगच्या निमित्ताने मधुराणी आठवड्यातले ५/६ दिवस मुंबईमध्ये असते. केवळ १/२ दिवस ती तिच्या मुलीला आणि कुटुंबाला वेळ देऊ शकते. याची रुखरुख नेहमीच तिला असते. यासाठीच मधुराणीने काही दिवसांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेतला आणि लेकीसोबत एका मस्त ट्रीपला गेली. या ऑस्ट्रेलिया ट्रीपच्या निमित्ताने तिने मुलगी स्वरालीसोबत बराच काळ घालवला. यावर आधारित एक सुंदर पोस्ट मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मधुराणीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “गेली ३ वर्षं माझं एक विशिष्ट रूटीन झालंय. ७/८ दिवस मुंबईत शूट करायचं आणि २/३ दिवस पुण्यात स्वरालीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा. सोपं नव्हतं, नाहीये…. long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं हो…गेल्या ३ वर्षात सलग असे ८/१० दिवस मी तिच्यासोबत घालवू शकलेले नाही. ह्याची रुखरुख असते, अपराधीपण असतं.. आणि खूप सारा ताण असतो.
माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया ट्रिप ची ही संधी चालून आली. ह्या सगळ्याचा योग जुळवून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा, कविमानाचा उमेश थत्ते. एक दिवस अचानक त्याचा फोन आला ‘मी तुझ्या ‘कवितेचं पान’ चा मोठा फॅन आहे…इथे काही कवी आहेत…तुझा एपिसोड इथे करता येईल का ? ‘
मी म्हंटलं, ‘ मला आवडेल पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते’
त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं… ‘आई… ‘च्या टीम ने पण प्रंचड cooperate करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली. तिथले एपिसोड छान झालेच आणि माझी आणि स्वरलीच ही सुट्टी अगदी संस्मरणीय ठरली. आणि ती तशी झाली ती आमच्या प्रेमळ होस्ट्स मुळे… उमेश- गौरी थत्ते आणि त्यांची मुलं अवनीश आणि अर्णव.
आमची उत्तम राहण्याची सोय, खाण्यापिण्याची चंगळ तर ह्यांनी पुरवलीच पण स्वरालीची खूप प्रेमाने काळजी घेतली , खरंतर तिचे लाड केले, सारे हट्ट पुरवले असंच म्हणायला हवं.. सिडनीमधलं जिणं खूप धकाधकीचे आहे, त्यात आपल्या पाहुण्यांसाठी रजा काढून त्यांना ठिकठिकाणी घेऊन जाणं, उत्साहाने फिरवणे इतकं सोपं नाही हो…
त्यांनी केला तो पाहुणचार नाही तर जीव लावणं असच म्हणायला हवं…
सिडनी ट्रिप उत्तम झालीच पण स्वराली ला अजून एक प्रेमाची फॅमिली मिळाली आणि दोन दोन दादा सुद्धा…!!”

मधुराणी जशी तिच्या मालिकेत आहे, अगदी तशीच प्रत्यक्षात देखील आहे. आपल्या मुलांना ती नेहमीच प्राधान्य देते. आपल्या मुलीला वेळ देता येत नसल्याच्या भावनेने तिने ही ट्रिप प्लॅन केली आणि मुलीसोबत मनसोक्त वेळ घालवला. याबद्दल तिचे नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘वेड’ चित्रपटाने आयफा 2023मध्ये मारली बाजी; ‘या’ विषेश पुरस्काराने अभिनेता सन्मानित
‘या’ सुपरस्टारला करायची होती ‘जंजीर’मध्ये भूमिका, अनेक कलाकारांनी नकार दिल्यावर अशी झाली सिनेमात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री

हे देखील वाचा