हिंदी चित्रपट जगतात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत यशाचे शिखर गाठले आहे. मात्र अनंत अडचणी येऊनही या कलाकारांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय गाठले आहे.यामध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. जॅकी श्रॉफ यांच्या आयुष्यात असा एक किस्सा घडला, ज्यामुळे त्यांचे नशीबच पालटले. काय होता तो किस्सा चला जाणून घेऊ.
हिंदी चित्रपट क्षेत्रातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत जॅकी श्रॉफ यांचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने जॅकी श्रॉफ यांनी ९०चा काळ चांगलाच गाजवला होता .’राम लखन’, ‘खलनायक’ असे अनेक चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने सुपरहिट केले मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने ते मिळेल तिथे काम करत होते. त्यांना एका ज्योतिषाने तु कधीही कलाकार होणार नाही असेही सांगितले होते.मात्र म्हणतात ना कोणाचे नशीब कधी पालटेल सांगता येत नाही. अगदी तसाच जॅकी श्रॉफ यांच्या ही आयुष्यात असाच प्रसंग घडला ज्यामुळे त्यांचे नशीबच बदलले.
समोर आलेल्या माहितीनुसार, एकदा जॅकी श्रॉफ बस स्टँडवर उभे होते.त्यावेळी त्यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि त्याने “मॉडेलिंग करणार का?” असे विचारले. त्या माणसाचा हा प्रश्न ऐकूण जॉकी श्रॉफ यांनी “ते काय असते?” असे विचारले त्यावेळी त्याने काही नाही फक्त फोटो काढायचे आहेत आणि त्याचे तुला पैसे सुद्धा दिले जातील. पैसे मिळतील या आशेने जॅकी श्रॉफ यांनी लगेच होकार दिला. या पहिल्या शूटसाठी त्यांना ७००० रूपये देण्यात आले होते. इथूनच जॅकी श्रॉफ यांच्या अभिनयाला सुरूवात झाली आणि त्यांनी या प्रचंड लोकप्रियता मिळवली. या घटनेआधी चित्रपटात जाण्याचे किंवा अभिनय करण्याचे कसलेच स्वप्न त्यांचे नव्हते.त्यांना शेफ व्हायचे होते. मात्र ते अभिनयक्षेत्रात अपघाताने आले आणि प्रचंड नाव कमावले.
- हेही पाहा –
- धनश्री वर्माच्या नवीन व्हिडिओने घातला धुमाकूळ, ‘गंगुबाई काठीयावाडी’च्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष
- सिजेन खान ४४ व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात, गर्लफ्रेंडच्या हातची बिर्याणी खाल्यानंतर घातली थेट लग्नाची मागणी
- शेहनाझ गिलने साधला चाहत्यांशी संवाद, सिद्धार्थच्या आठवणीत चाहते पुन्हा एकदा झाले भावुक