Birthday | अवघ्या ६व्या वर्षी केली होती गायनाला सुरुवात, आज कोटीच्या संपत्तीच्या मालकीण आहेत अलका याग्निक

अलका याग्निक (Alka Yagnik) हे नाव माहित नसेल, असा एकही रसिक प्रेक्षक देशभरात सापडणार नाही. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यानंतर प्रत्येकाच्या ओळखीचा आणि आवडीचा आवाज म्हणजे अलका याग्निक. आपल्या जादूई आवाजाने अलका याग्निक यांनी अनेक दशके संगीत क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रविवारी (२० मार्च ) अलका याग्निक यांचा वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल. 

View this post on Instagram

A post shared by Alka Yagnik (@therealalkayagnik)

संगीत क्षेत्रातील जादूई आवाज म्हणून अलका याग्निक यांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. त्यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या या जादूई आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाचे असंख्य चाहते आपल्याला देशभरात पाहायला मिळतात. अलका याग्निक यांचा जन्म २० मार्च १९६६ मध्ये झाला.

View this post on Instagram

A post shared by Alka Yagnik (@therealalkayagnik)

अत्यंत कमी वयात त्यांनी संगीत क्षेत्रात काम करायला सुरूवात केली होती. सध्या त्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अलका याग्निक यांची एकूण संपत्ती ९ मिलीयन डॉलर इतकी आहे, ज्याचे भारतीय चलनात ६८ कोटी इतकी किंंमत होते. अलका याग्निक दर महिन्याला २१ लाख रुपये कमावतात, तर त्यांचे वार्षिक उत्पन्न २ कोटी इतके आहे.

View this post on Instagram

A post shared by Alka Yagnik (@therealalkayagnik)

गायिका अलका याग्निक यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी पहिले गाणे गायले होते. हे गाणे त्यांनी आकाशवाणीमध्ये गायले होते. त्या दहा वर्षाच्या असताना त्यांच्या आईने त्यांना मुंबईला आणले. इथे त्यांची ओळख राज कपूर यांच्याशी झाले. त्यांच्या आवाजाने मोहित झालेल्या राज कपूर यांनी त्यांना संगीत क्षेत्रात अनेक संधी मिळवून दिल्या. यानंतर त्यांना कधीही मागे वळून पाहावे लागले नाही. अलका याग्निक यांनी आपल्या दमदार आवाजाने अनेक सुपरहीट गाणी गायली आहेत. यामध्ये टिप टिप बरसा पाणी, ऐ मेरे हमसफर, अगर तुम साथ हो अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post