Friday, December 6, 2024
Home बॉलीवूड माधुरी दीक्षितचे एक्स अकाउंट झाले हॅक? नवी पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

माधुरी दीक्षितचे एक्स अकाउंट झाले हॅक? नवी पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नियमितपणे इंस्टाग्राम आणि एक्स दोन्ही अकाउंटवर पोस्ट शेअर करते. पण, आज तिने अशी पोस्ट शेअर केल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. लोक विचारू लागले की तिचा आयडी हॅक झाला आहे का? खरं तर असं झालंय की, अभिनेत्री तिच्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये स्वत:ला फिजिशियन म्हणवत आहे. मात्र, आता तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.

माधुरी दीक्षितने X हँडलसह एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये स्वत:ला फिजिशियन म्हणवून घेत माधुरी दीक्षितने सांगितले की, ती तिच्या रुग्णांशी कशी वागते. अशी पोस्ट पाहून युजर्सनी प्रश्नांची सरबत्ती केली. लोक फक्त दोन प्रश्न विचारताना दिसले की एकतर तिचे पती श्री नेने यांनी चुकून तिच्या अकाऊंटवरून पोस्ट केले आहे.

मात्र, ही पोस्ट माधुरीच्या अकाऊंटवर थोड्यावेळ राहिली. काही मिनिटांनंतर ती डिलीट करण्यात आली. यामध्ये अभिनेत्रीने लिहिले की, ‘एक डॉक्टर म्हणून मी माझ्या रुग्णांसाठी आवश्यक ते सर्व केले. मी त्यांना नेहमीच कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली आहे. काय बरोबर आणि काय अयोग्य हे ठरवणे नेहमीच सोपे केले.

अभिनेत्रीचे पती श्रीराम नेने हे व्यवसायाने डॉक्टर असल्याची माहिती आहे. त्यामुळे, युजर्सना वाटले की कदाचित डॉ. नेने यांनी माधुरी दीक्षितच्या एक्स अकाउंटवरून चुकून पोस्ट केले असावे. त्याच वेळी, काही लोकांना वाटले की कदाचित तिचे खाते हॅक झाले आहे. माधुरी दीक्षितच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या कलर्स टीव्हीच्या डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दीवाने’ मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.

‘डान्स दिवाने 4’ चा आगामी भाग खूप खास असणार आहे. या अभिनेत्रीचा वाढदिवस सेटवर साजरा होणार आहे. या वेळी तिचे पती श्रीराम नेनेही सहभागी होणार आहेत. यावेळी अभिनेत्री तिच्या ‘मेरा पिया घर आया’ या हिट गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेनेही रोमँटिक गाण्यांवर डान्स करताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आलिया भट्टच्या पावलावर पाऊल ठेवून अंकिता लोखंडे मुलांसाठी करणार ‘या’ खास गोष्टी
चिरंजीवी माला यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित

हे देखील वाचा