‘एक बार पेहरा हटा दे शराबी’ गाण्यावर थिरकली ‘धकधक गर्ल’; तुषार अन् धर्मेशनेही धरला ठेका


कलाकार जेव्हा शूटिंग करत असतात, तेव्हा सेटवर ते अतिशय धमाल, मस्ती करत असतात. त्यांच्या शूटिंगच्या वेळी मिळणाऱ्या फावल्या वेळात हे कलाकार सध्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक मजेशीर, डान्सचे, गाण्याचे व्हिडिओ तयार करून पोस्ट करत असतात. सोशल मीडियावर अनेक शूटिंगच्या सेटवरचे असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात ‘डान्स दिवाने ३’ चे कलाकार देखील मागे नाहीत.

‘ब्युटी विथ ब्रेन’ असे दुर्मिळ कॉम्बिनेशन असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी म्हणजे सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण. तिने तिच्या अभिनयाने, सौंदर्याने, निखळ हास्याने आणि तिच्या नृत्याने सर्वांनाच घायाळ केले आहे. माधुरी सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध डान्स रियॅलिटी शोचे परीक्षण करत आहे. यावेळी तिने धर्मेश आणि तुषार या दोन परीक्षकांसोबत मिळवून एक धमाल डान्स व्हिडिओ तयार केला आहे. सध्या हा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच गाजताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ते तिघं सध्या हिट होणाऱ्या ‘एक बार पेहरा हटा दे शराबी’ या गाण्यावर रील्स तयार करून धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. यात माधुरी दीक्षितचे एक्सप्रेशन पाहणारे नक्कीच घायाळ होतील. या डान्स शो चे परीक्षण करणाऱ्या माधुरीचा प्रत्येक लूक नेहमी व्हायरल होतो.

सध्या माधुरी जज करत असलेला डान्स दीवाने’ हा शो अंतिम आठवड्यावर येऊन पोहचला आहे. यावर्षी या शो चे तिसरे पर्व आहे. या पर्वाला देखील रसिकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. लवकरच आपल्याला या शो च्या विनरचे नाव समजेल. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी या शोमध्ये त्यांची उपस्थिती लावली होती. या शो दरम्यान त्यांना माधुरी आणि डान्स शोच्या टीमने आर्थिक मदत देखील केली. मात्र, या मदतीवरून माधुरीला ट्रोल देखील केले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नापूर्वी दिशाच्या रूमबाहेर ‘मेरी दुल्हन कहा है’, म्हणत ओरडताना दिसला राहुल; नववधू बाहेर येताच…

-सुपरस्टार नागार्जुनची सून समंथाने कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाली, ‘माझा गुड बॉय आणि…’

-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज


Leave A Reply

Your email address will not be published.