Sunday, July 21, 2024

कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ अन् भरजरी पैठणीतील माधुरीचा मराठमोळा लूक करतोय सर्वांना घायाळ

सिनेसृष्टीमध्ये एका पेक्षा एक मादक आणि सुंदर अभिनेत्री आहेत. मात्र आपल्या मराठमोळ्या माधुरी दीक्षितची बात काही औरच आहे. तिच्या घायाळ अभिनयाने आणि दिलखेचक नृत्याने बॉलिवूडमध्ये गेली अनेक दशकं राज्य करत आहे. तिच्या मनमोहक हास्यावर तर तिचे चाहते आणि कलाकार देखील फिदा आहेत. माधुरी दीक्षित नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर येते ते मनमोहक सौंदर्य आणि निरागस हास्य. माधुरी आज वयाच्या पन्नाशीनंतरही तितकीच सुंदर दिसते. सोशल मीडियावर माधुरी चांगलीच सक्रिय असते. नेहमी ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच माधुरीने तिचे अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक महाराष्ट्रीय अवतार सर्वांनाच घायाळ करत आहे. हिरव्या रंगाची केशरी काठ असलेली साडी तिने नेसली आहे. या साडीवर तिने मोत्याचा नेकलेस, मोत्याचे कानातले आणि नथ घातली असून तिचा हा संपूर्ण लूक अधिक खुलवत आहे तिच्या कपाळावरील चंद्रकोराची टिकली. अतिशय लाघवी आणि लक्षवेधी तिचा महाराष्ट्रीन लूक खूपच भाव खाऊन जात आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्हाला तिच्या वयाचाही विसर पडल्याशिवाय राहणार नाही. या लूकवर तिने अतिशय साधी आणि मेसी हेअर स्टाईल केली आहे.

माधुरीच्या या साजशृंगारावर चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. माधुरीने तिच्या या लूकमध्ये इंस्टाग्राम अकाउंट वर एक रिल व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये तिची काळजाला घायाळ करणारी अदा पाहायला मिळत आहे. माधुरीने हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे की,”कारण मला हे गाणं खूप आवडत.” सध्या ती ‘डान्स दिवाने’ या शो मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. या आठवड्यात डान्स दिवानेमध्ये गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खास भाग रंगणार असून, यावेळेस अनेक शानदार डान्स परफॉर्मन्स देखील सादर होणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा