बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षीत नेटफ्लिक्सची वेबसीरिज ‘द फेम गेम’मधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती सध्या तिच्या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच माधुरीने सांगितले की, तिला कधीही तिचा स्टारडम गमवण्याची भीती नव्हती. तिने सांगितले की, फेम तिच्या आयुष्यातील वेगळा भाग आहे.
माधुरी दिक्षीतने (Madhuri dixit)दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिच्यासाठी हे महत्वाचं आहे की, ती तिचे आयुष्य कसे जगते. तिने सांगितले की, “तिच्या आयुष्यात हे जास्त महत्त्वाचं आहे की, ती इतरांना इज्जत देते, ती नैतिकता बाळगून काम करते. आयुष्यातील मूल्यांना महत्व देते. तिच्या कलेप्रती ती इमानदार असते.”
माधुरी दिक्षीतने मुलाखतीत पुढे सांगितले की, “आपल्याला फेमची सवय होते. परंतु हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. काही लोकांना या फेमची सवय झाली की, ती याशिवाय राहू शकत नाही. ते असे विचार करतात की, तर मोठे कलाकार आहेत, त्यामुळं ते जिथे कुठे जातील तिथे लोकांनी त्यांना चिअर केले पाहिजे. त्यांच्यासाठी फेम हेच त्याच्या कामाचे फळ असते.” अभिनेत्रीने हे देखील सांगितले की, “त्यांना त्यांची कला अवाडते. त्यांना डान्स करायला आवडतो. तुम्ही जो विचार करता तेच तुम्ही बनता. ”
माधुरी दिक्षीतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘अबोध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु तिला ‘तेजाब: या चित्रपटाने खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट दिले. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली. म्हणून आज तिचा लाखांमध्ये चाहता वर्ग आहे.
हेही वाचा :