बॉलिवूड कलाकार त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. चित्रपट कलाकार असोत किंवा त्यांची मुले, कोणत्या ना कोणत्या कारणाने ते चर्चेत येतात. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकालाच बॉलिवूडची प्रचंड क्रेझ आहे. त्याचवेळी एक असे प्रकरण समोर आले आहे की, ज्यामुळे तुम्हीही हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत.
आजपर्यंत आपण महापुरुषांबद्दलचे प्रश्न परीक्षेत आलेले पाहिले आहेत. मात्र, मध्यप्रदेशातील खंडवा येथील एका शाळेत सामान्य ज्ञानाच्या परीक्षेत करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव विचारण्यात आले. हा प्रश्न पाहून सहावीमध्ये शिकणारे विद्यार्थीही हैराण झाले आहेत.
खंडव्यातील खासगी शाळेने प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारला की, तो वाचून सगळेच चक्रावून गेले. प्रत्यक्षात सहावीच्या मुलांना टर्म परीक्षेत करीना कपूरच्या (Kareena Kapoor) मुलाचे नाव विचारण्यात आले होते. ही प्रश्नपत्रिका पालक-शिक्षक संघापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. जिल्हा शिक्षण विभागाकडून शाळेला नोटीस देण्याचे सांगण्यात आले आहे. हे प्रकरण सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडवा येथील ऍकॅडमिक हाईट पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सहावीची टर्म परीक्षा सुरू होती. मुलांचा सामान्य ज्ञानाचा पेपर होता. यामध्ये करीना आणि सैफ (Saif Ali Khan) यांच्या मुलाचे पूर्ण नाव काय? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. ही बाब मुलांच्या पालक-शिक्षक संघाला समजली असता, त्यांनी असे प्रश्न विचारल्याबद्दल आक्षेप घेतला. ही बाब गंभीर असल्याचे सांगत त्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
संघाच्या एका सदस्याचे म्हणणे आहे की, शाळेला प्रश्न विचारायचे असते, तर देशाच्या महापुरुषांबद्दल किंवा बलिदानांबद्दल विचारले असते. आता मुलांनीही लक्षात ठेवावे का? की, देशातील कलाकारांच्या मुलांचे नाव काय आहे? याबाबत जिल्हा प्रशासनालाही अवगत करून शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित शाळेला नोटीस देऊन जाब विचारण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
करिना-सैफला आहेत २ मुले
करीना कपूर आणि सैफ अली खान यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा तैमूर अली खान असून, तो फक्त ५ वर्षांचा आहे, तर त्यांना एक लहान मुलगाही आहे. त्याचे नाव जेह अली खान आहे. जो आता फक्त १० महिन्यांचा आहे. त्यांची मुले प्रसिद्धीच्या झोतात राहतात. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.
हेही वाचा-