‘गणपत’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित; टायगर श्रॉफच्या अंदाजाने केला धमाका, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित


आपल्या आवडत्या कलाकाराच्या आगामी चित्रपटाबद्दल सर्वांनाच नेहमी उत्सुकता असते. कलाकार देखील आपल्या फॅन्सला नाराज करत नाही. ते देखील चाहत्यांच्या इच्छा अनेकदा पूर्ण करताना दिसतात. टायगर श्रॉफचा लवकरच ‘गणपत’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासुनच हा सिनेमा प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. टायगर श्रॉफचा हटके आणि रावडी अंदाज पुन्हा पाहायला मिळणार असल्याने फॅन्स या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. नाताळच्या पार्श्वभूमीवर टायगर श्रॉफने त्याच्या सिनेमाचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि कृती सेनन (Kriti Sanon) यांच्या आगामी ‘गणपत’ (Ganpath Teaser) सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये टायगर श्रॉफचा जबरदस्त ऍक्शन लूक दिसत आहे. त्याच्या सिक्स पॅक बॉडीने आणि शर्टलेस अवताराने सोशल मीडियावर धमाका केला आहे. हा टिझर प्रदर्शित झाल्या झाल्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी टिझरवर जबरदस्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

कृती सेनन, टायगर श्रॉफ यांनी ‘गणपत’चा टिझर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. टायगर श्रॉफने हा टिझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “तयार राहा! देवाच्या आशीर्वादाने प्रेक्षकांना भेटायला येत आहे. #Ganpath. पुढच्या नाताळला चित्रपटगृहांमध्ये.” टायगर आणि कृतीचा हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘गणपत’ सिनेमा पुढच्यावर्षी नाताळला अर्थात २३ डिसेंबर, २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. या टिझरमध्ये टायगर श्रॉफ लॉन्ग जंप मारत त्याचा आकर्षक लूक दाखवत आहे. मात्र यात कृतीचे कुठेही दर्शन होत नाही. ‘गणपत’ हा मेगाबजेट सिनेमा असून, यात टायगरसोबत कृती देखील ऍक्शन करताना दिसणार आहे.

टायगर आणि कृतीने सोबतच ‘हेरोपंती’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आणि कृती, टायगर एका रात्रीत स्टार झाले. त्यानंतर टायगरने ‘बाघी’ सिरीज, ‘वॉर’ आदी हिट सिनेमे केले आहेत, तर कृतीने ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘मिमी’ आदी सिनेमे केले आहेत. या दोघांना पुन्हा एकदा पडद्यावर सोबत बघण्यासाठी त्यांचे फॅन्स खूपच उत्सुक आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!