Wednesday, July 3, 2024

मद्रास हाय कोर्टाचा विजयबाबत मोठा निर्णय, अमेरिकेतून मागवलेल्या बीएमडब्ल्यू कारशी आहे संबंध

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थालापती विजय आणि त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. १५ जुलै) विजयला अमेरिकेतून बीएमडब्ल्यू कार आयात करण्याच्या प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने सांगितले की, विजयला कराची रक्कम जमा करण्यास उशीर झाल्यामुळे, दंड भरण्यास जबाबदार असेल. महत्त्वाचे म्हणजे, त्याला भरावी लागणारी रक्कम ही २००५ पासून नाही, तर २९ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२१ पर्यंतचीच असेल.

न्यायमूर्ती आर. सुरेश कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, विजय (Thalapathy Vijay) हा प्रवेश कर भरण्यास जबाबदार होता. कारण, न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने २९ जानेवारी, २०१९ रोजी राज्य सरकारला प्रवेश कर आकारण्याचा अधिकार असल्याचे सांगितले होते. पुढे खंडपीठाने म्हटले की, वाणिज्य कर विभागाने २००५ पासून दंड आकारून ३०.२३ लाख रुपयांची मोठी रक्कम मागायला नको होती. हा दंड २९ जानेवारी, २०१९ पासून लागू केला जाऊ शकतो.

विजय याने जानेवारी २०२२मध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. तसेच, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी वाणिज्य कर विभागाद्वारे जारी केलेल्या एका नोटिशीला आव्हान दिले होते. यामध्ये त्याला ३०.२३ लाख रुपयांच्या दंडासोबत प्रवेश कराच्या रुपात ७.९८ लाख रुपयांचा कर देण्यास सांगितले होते.

यावर सुपरस्टार विजय याच्या वकिलाने म्हटले होते की, त्याने डिसेंबर, २०२१ पूर्वीच ७.९८ लाख रुपयांचा कर भरला आहे. तसेच, तो एकटाच दंडाला आव्हान देत आहे. त्याने त्यावेळी बीएमडब्ल्यू ही गाडी भारतात आयात केली होती. कारण, त्यावेळी चेन्नईमध्ये लक्झरी कारचा कोणताही विक्रेता नव्हता. अभिनेत्याने न्यायालयाला डिमांड नोटीस आणि वसुलीची नोटीस रद्द करण्याची विनंतीही केली होती.

विजयचे सिनेमे
थालापती विजय याने १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘वेत्री’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. यानंतर त्याने ५०हून अधिक सिनेमात काम केले. त्याने १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘पूवे उन्नाकागा’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. हा त्याच्या कारकीर्दीतील पहिला सर्वात यशस्वी सिनेमा होता. यानंतर त्याने ‘थेरी’, ‘बिगिल’, ‘मास्टर’ यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

शॉकिंग! सामान खरेदीसाठी निघालेल्या गायिकेसोबत रिक्षाचालकाकडून घृणास्पद कृत्य

वर्षाकाठी २५ कोटी छापते कॅटरिना, ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीणबाई; चार वर्षे ठरलीये आशियाची मादक अभिनेत्री

‘हा’ आहे २०२२चा सगळ्यात ‘लोकप्रिय’ चित्रपट, पहा प्रेक्षकांची पसंती नेमकी कोणाला?

हे देखील वाचा