Tuesday, April 14, 2026
Home टेलिव्हिजन 13 वर्षांत ‘महाभारत’मधील छोटा कृष्णचा जबरदस्त ट्रान्सफॉर्म, आता दिसतो हँडसम हंक

13 वर्षांत ‘महाभारत’मधील छोटा कृष्णचा जबरदस्त ट्रान्सफॉर्म, आता दिसतो हँडसम हंक

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे झाले आहेत. तर या अश्या मालिकांना आज पर्यंत कोणत्याही मालिकेने त्याला टक्कर दिली नाही. मात्र एक अशी मालिका आहे. जी लोकप्रियतेच्या जवळपास पोहोचली. आणि ती 2013 मध्ये प्रदर्शित झाली होती.

तर 2013 मधील ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक म्हणजे कृष्णाचे पात्र, जे सौरभ राज जैन आणि कुंवर विक्रम सोनी यांनी साकारले होते. दोन्ही अभिनेते लोकप्रिय झाले. कुंवर विक्रम सोनी यांनी तरुण कृष्णाची भूमिका साकारली होती. आता, मालिका संपून 13 वर्षे उलटली आहेत आणि कुंवर विक्रम सोनी यांच्यात लक्षणीय बदल झाला आहे. त्यांचा अलीकडील लूक त्यांना ओळखूही देणार नाही.

कुंवर विक्रम (vikram) सोनी याला त्याच्या महाभारत’ मधील अभिनयामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. तर आता तो इन्स्टाग्रामवर अपडेट असतो आणि वारंवार आपल्या लूकची झलक शेअर करत असतो. त्याची स्टाईलसुद्धा बरीच आधुनिक आहे. इन्स्टाग्राम या  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे 13000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.कुंवरने  ‘हल्ला बोल’, ‘देश की बेटी नंदिनी’, ‘महाभारत’, ‘सूर्यपुत्र कर्ण’, ‘राधा कृष्ण’, ‘गांधी बात’ आणि ‘सावधान इंडिया’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. तो शेवटचा ‘राधा कृष्ण’ या टीव्ही शोमध्ये दिसला होता.

आशाताईंना गायिका व्हायचे नव्हते; अशा प्रकारे झाल्या गायिका

हे देखील वाचा